Crime News esakal
नाशिक

Nashik Crime: टेस्ट ड्राईव्हला नेलेली इलेक्ट्रिक कार घेऊन पसार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : पाथर्डी फाटा परिसरातील शोरुममधून टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने भामट्याने सुमारे २० लाख रूपये किमतीची इलेक्ट्रीक कार पळवून नेल्याचा प्रकार घडली.

बराच वेळ होऊनही संशयित कारसह परत न आल्याने वितरकाने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (electric car taken for test drive stolen Nashik Crime)

मनोज प्रकाश साळवे असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कपील अशोक नारंग (रा. सिरीन मेडोज, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, नारंग यांचे पाथर्डी फाटा भागात कार मॉल नावाचे शोरूम आहे.

इलेक्ट्रीक कार खरेदीचा बहाणा करून शोरूममध्ये आलेल्या संशयित साळवे याने विविध कारची व किमतींची माहिती घेतली. १९ लाख रूपये किमत असलेल्या इलेक्ट्रीक कार (जीजी २६ एबी ४८४८) त्याने पसंत केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यावेळी त्याने टेस्ट ड्राईव्हची इच्छा व्यक्त केल्याने नारंग यांनी कार त्याच्या ताब्यात सुपूर्द केली. सदरची घटना मंगळवारी (ता. २२) दुपारच्या सुमारास घडली.

पाच ते सात तास उलटूनही संशयित कार न परतल्याने नारंग यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

संत्री विकून शाळा उभारली, पद्मश्री विजेत्याला SIRची नोटीस; कागदपत्रे सादर करण्यास दिली मुदत

INDIA VS JAPAN: भारत-जपान मालिकेच्या मीडिया राईट्सचा पेच सुटला! बघा Free मध्ये कुठे पाहता येणार सामने; यजमान जपाननेही संघ जाहीर केला

कमरेला भलामोठा ढोल अन् चेहऱ्यावर आनंद; गणरायाच्या आगमनासाठी सज्ज झालेल्या या अभिनेत्रीला ओळखलंत का?

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT