Death news esakal
नाशिक

Nashik News : माजी सैनिकाची गोळी झाडून आत्महत्त्या

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शिंगेव बहुला येथे सिक्युरिटी गार्ड कंपनीत सुरक्षारक्षक असलेल्या माजी सैनिकाने स्वत:च्याच बंदुकीने हनुवटीवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. बाबू मुन्ना कनोजिया (५३, रा. बेरडगल्ली, शिंगवे बहुला, ता. नाशिक) असे माजी सैनिकाचे नाव आहे.

कनोजिया यांनी गुरुवारी (ता.२) रात्री साडेनऊच्या सुमारास घरात पलंगावर पहुडलेले असताना काहीतरी कारणातून सिंगल बोअरच्या बंदुकीने हनुवटीवर गोळी झाडून घेतली. (Ex soldier commits suicide by shooting himself Nashik News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

त्यांचे भाऊ श्याम कनोजिया (रा. पाटोळे गल्ली, शिंगवे बहुला) यांनी देवळाली कॅम्प पोलिसांना घटनेची माहिती कळविली. उपनिरीक्षक लियाकत पठाण व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबू हे माजी सैनिक असून, त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता. सध्या ते स्वामी ओम सिक्सुरिटी अॅन्ड सर्व्हिसेसमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करीत होते. घरात ते मुलीसह राहत होते.

त्यांची मुलगी ब्युटीपार्लरचा व्यवसाय करते तर मुलगा पुण्यात शिक्षण घेतो. पत्नी मुंबईतील लहान मुलांच्या संस्थेत केअर टेकर म्हणून काम करतात. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे -पाटलांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस, आतापर्यंत काय घडलं

Smart Meter Fire Uchgaon : उचगावमध्ये नवीन स्मार्ट मीटरने घेतला पेट; पहाटे घडलेल्या घटनेमुळे खळबळ, स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांची मिमिक्री करणाऱ्याच्या मदतीने करायचा घोटाळे; भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT