esakal
नाशिक

Nashik Tomato Rate : टोमॅटोचे बाजारभाव दरात घसरण; सरासरी साडेचारशे रुपयाचा भाव

सकाळ वृत्तसेवा

Nashik Tomato Rate : महिन्याभरापासून तेजीत असलेल्या टोमॅटोच्या दरात घसरण सुरु झाली आहे. शनिवारी (ता.२६) नाशिक बाजार समितीत झालेल्या लिलावात टोमॅटोस सरासरी साडेचारशे तर सर्वाधिक साडेपाचशे रुपयाचा दर मिळाला. ( Fall in market price of tomatoes nashik news )

गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो उत्पादन झाल्याने बाजारभाव पूर्णपणे कोसळले होते.

अक्षरशः बाजारभाव कमी मिळाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आंदोलन केले होते. यावर्षी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड कमी केल्याने आवक कमी झाली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परिणामी बाजारभाव चांगला मिळाला होता. सध्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नायगाव, जायगाव, दोडी, दापुर, मुसळगाव, दातली, खोपडी, समशेरपूर (ता. सिन्नर) या भागातून टोमॅटो येत आहे.

गेल्या चार पाच दिवसांपासून टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण सुरु झाली आहे. शनिवारी बाजार समितीत पाच हजार ते ६ हजार ४७७ कॅरेट्सची आवक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT