Bogus Seed esakal
नाशिक

बोगस बियाणे, औषधे, खते विक्रेत्यांवर कारवाई करावी; शेतकऱ्यांची मागणी

अनेक ठिकाणी पेरणी झाल्यानंतर बियाणे उगवत नसल्याने हजारो रुपये व कष्ट वाया जातात.

सकाळ वृत्तसेवा

अंतापूर (जि. नाशिक) : कृषी विभागाने बोगस बियाणे, बनावट औषधे, खते विक्री करणाऱ्यांना व्यावसायिकांना परवानगी न देता लक्ष ठेवून कारवाई करावी, अशी मागणी बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सध्या खरीप हंगाम असल्याने बळीराजा मका, सोयाबीन, भुईमूग व इतर बियाणे दुकानातून विकत घेऊन पेरणी करीत आहे. मात्र, चार- पाच वर्षापासून अनेक ठिकाणी पेरणी झाल्यानंतर बियाणे उगवत नसल्याने हजारो रुपये व कष्ट वाया जातात. आता विविध रासायनिक खते, औषधे, कीटकनाशकांच्याही अनेक प्रकारच्या बनावट कंपन्या बाजारात दाखल होवून शेतकऱ्यांची फसवणूक करू शकतात. मागीलवर्षी मुंगसेपाडा येथील हिरामण गावित यांनी मुल्हेर येथील दुकानदाराकडून सोयाबीन बियाणे घेऊन पेरणी केले होते. पंधरा दिवस होऊनही बियाण्यास कोंब न फुटल्याने पीक वाया गेले होते. त्यामुळे तालुका व पंचायत समितीतील कृषी विभाग अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परवानाधारक, अधिकृत दुकानदारांना बियाणे, औषधे, खते विक्रीची परवानगी देऊन बनावट जातीचे घटक विक्री होणार नाहीत, याबाबत सूचना देण्याची मागणी मुल्हेरचे माजी सरपंच पंडितराव जगताप, रोहिदास जाधव, निवृत्ती खैरनार, राजेंद्र गांगुर्डे, हिरामण गावित, नंदलाल निकम, शिवाजी देवरे, सुनील जाधव, भास्कर आहिरे, आदिवासी पश्‍चिम परिसरासह शेतकऱ्यांनी केली आहे.

''पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतकरी मिळेल त्या दुकानातून बियाणे, खते, औषधे घेत असतो. परंतु, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, बियाणे व इतर घटकांची वाजवीपेक्षा जास्त किंमत राहणार नाही, याबाबत कृषी विभागाने दक्ष रहावे. बनावट कंपनीद्वारे बोगस बियाणे, खते, औषधांची विक्री झाल्यास दुकानदाराचा कायमस्वरूपी परवाना रद्द करून गंभीर स्वरूपाची कारवाई करावी.'' - रामकृष्ण अहिरे, माजी सभापती, पंचायत समिती, बागलाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT