death esakal
नाशिक

जन्मदात्याकडूनच मुलाचा खून; घटनेमुळे खळबळ

येवला तालुक्यातील कोळम खुर्दची घटना

संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : अनेक वर्षे बेपत्ता असलेल्या बापाने जमिनीसाठी आपल्याच मुलाचा कुऱ्हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना येवला तालुक्यातील कोळम खुर्द येथे घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

येवला तालुक्यातील कोळम खुर्दची घटना

पोलिसपाटील असलेले गणेश भांडे तालुक्यात सोज्वळ व प्रेमळ स्वभावामुळे लोकप्रिय होते. शुक्रवारी (ता. २३) दुपारी चार ते पाचच्या दरम्यान ही घटना घडली. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. जमिनीच्या वादातून कौटुंबिक कलह होताना गणेश याचे वडील संशयित आरोपी विलास भांडे यांनीच हा खून केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. गणेश यांच्या आईच्या नावावर असलेली शेतजमीन आपल्या नावावर करून देण्याची मागणी वडिलांकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले. याच वादातून हा प्रकार झाल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंनी केली फडणवीसांची मिमिक्री; RJ Malishkaची आठवण, 'मिसिंग लिंक'वरून धारेवर धरलं

तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय! शरद पवारांच्या कृतीने शिवसेना दुखावली, राऊतांनी व्यक्त केली नाराजी

Marathi News Live Updates: नागपुरातील गोंधणीतील खड्ड्यांवरून मनसेचे खड्ड्यात बसून आंदोलन

Farmer Protest: सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा मुद्द्यावर रविकांत तुपकर आक्रमक! शेतकऱ्यांसह विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न; सातबारे भिरकावले..

'बाघाचं पात्र साकारून आता पाठ दुखतेय' तारक मेहतामधील तन्मय वेकारिया म्हणाला, 'मी सरळ उभा सुद्धा राहू शकत नाहीय...'

SCROLL FOR NEXT