esakal | गॅंगस्टर रवी पुजारीला पोलिस कोठडी; नाशिक न्यायालयाने सुनावला निर्णय

बोलून बातमी शोधा

nashik court

गॅंगस्टर रवी पुजारीला पोलिस कोठडी; नाशिक न्यायालयाने सुनावला निर्णय

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : खंडणी आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात मुंबईतील गँगस्टर रवी पुजारी यास नाशिक न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. २०११ मध्ये पाथर्डी फाटा येथील एका बांधकाम साईट्सवर पुजारी टोळीतील चार आरोपींनी गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा: असे घडले मृत्यूतांडव! नाशिक ऑक्सिजन गळतीची घटना cctv मध्ये कैद; पाहा VIDEO

नाशिक न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली

मुंबई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सोपान निघोट यांनी मोहनानी खंडणी प्रकरणी रवी पुजारीला शुक्रवारी (ता.२३) विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश गणेश देशमुख यांच्यासमोर हजर केले. मोहनानी यांना रवी पुजारी परदेशातून कॉल करून खंडणी मागत होता. हे कॉल रेकार्ड असून, आवाजाचे नमुने तपासणे, हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली शस्त्रे कोठून आली, हल्ल्याच्या योजनेसाठी पैसे कसे उभे राहिले अशा विविध दहा ते बारा कारणांसाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील ॲड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी केली. ही मागणी मान्य करीत न्यायालयाने पुजारीला २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती : संशय बळावला! ऑक्सिजन ठेकेदार कंपनीचा लागेना थांगपत्ता