dilapidated bridge latest Marathi news esakal
नाशिक

उमा पार्क भागातील पूल खचण्याची भीती; नागरिकांनी अडथळे टाकून रस्ता केला बंद

राजेंद्र बच्छाव

सिडको (जि. नाशिक) : जोरदार पावसामुळे (Heavy Rain) सिडकोतील शुभम पार्ककडून उमा पार्ककडे जाणारा वाघ मळा येथील रस्त्यावरील पूल (Bridge) खचण्यास सुरवात झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी स्वतःच अडथळे टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. अनेक दिवसांपासून येथील रस्त्याची मागणी असतानाही ती पूर्ण होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.(Fear of bridge collapse in Uma Park area Nashik latest Marathi News)

जुन्या प्रभाग २८ येथील वाघ मळा येथे पावसाळी नाल्यावर पूल बांधलेला आहे. अनेक वर्षे जुना झालेला पूल आधीपासूनच निकृष्ट दर्जाचा बनविलेला आहे. त्यातच सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पूल रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खचण्यास सुरवात झाली आहे.

योग्य खबरदारी न घेतल्यास पूल पाण्यात वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील युवक रवींद्र कदम, महेश पगार, राहुल पाटकर, प्रकाश शिंदे, तुषार निंबेकर यांनी पुढाकार घेत रस्त्यावर सिमेंटचे खांब टाकून हा रस्ता बंद केला आहे.

या ठिकाणचा रस्ता व पुलाचे काम तसेच जमीन हस्तांतर असा तब्बल ३०० कोटी रुपयांचा कामाचा प्रकल्प आहे. या ठिकाणी नागरिकांची मागणी लक्षात घेता नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या पाठपुराव्याने महापौर, महापालिका आयुक्त व अधिकारी यांचे पाहणी दौरे झाले. मात्र, काम मार्गी न लावल्याने दौरे केवळ देखावा करण्यासाठी झाल्याचा आरोप माजी नगरसेवक सूर्यवंशी यांनी केला आहे.

"हा रस्ता आणि पूल अत्यंत धोकादायक स्थितीत आले आहेत. अजून पावसाचा जोर वाढला आणि पाणी वाढले तर येथे कधीही मोठा अपघात होऊ शकतो अथवा वाहनदेखील वाहून जाऊ शकते. संबंधितांनी यात तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे." -महेश पगार, स्थानिक नागरिक

"मी या कामासंदर्भात १५ वर्षांपासून मनपाकडे पाठपुरावा करतो आहे, मात्र प्रशासन लक्ष देत नाही. अनेकदा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे दौरे झाले मात्र, प्रश्न मार्गी लागला नाही. या ठिकाणी दुर्घटना घडल्यास शिवसेनास्टाइल आंदोलन करू." -डी. जी. सूर्यवंशी, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT