कॉफी विथ सकाळ : पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे

Speaking on Coffee with Sakal Nashik Commissioner of Police Jayant Naiknavare & Dr. Rahul ranalkar
Speaking on Coffee with Sakal Nashik Commissioner of Police Jayant Naiknavare & Dr. Rahul ranalkaresakal

नाशिक : आजचा तरुण तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा आहे. त्याला जे हवे ते सहज उपलब्ध होत असल्याने त्याची महत्त्वाकांक्षाही वाढली आहे. ती महत्त्वाकांक्षा पूर्तीसाठी तो कष्ट घेत असताना अवतीभवतीच्या प्रलोभनांना बळी पडतो.

करिअरची (Career) महत्त्वाकांक्षा बाळगताना अशा प्रलोभनांचा काही काळासाठी त्याग करण्याचीही भूमिका घेतली पाहिजे. तसे केले तर यश हमखास मिळते; अन्यथा बुद्धिमत्ता असतानाही केवळ त्यागाची भूमिका योग्यवेळी न घेतल्याने आयुष्यात तो यशस्वी होऊ शकत नाही, असा मोलाचा सल्ला तरुण वर्गाला देतानाच, आजच्या ऑनलाइनच्या जमान्यात वावरताना जर योग्य ती खबरदारी घेतली नाही, तर आर्थिक फसवणूक होते.

याबाबत पोलिस यंत्रणेकडून वारंवार जनजागृती करूनही ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी खबरदारी हाच एकमेव उपाय असल्याचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik Commissioner of Police Jayant Naikanavare) यांनी सांगितले. (Coffee with Sakal with Nashik Commissioner of Police Jayant Naikanavare Latest Marathi News)

‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमांतर्गत सातपूर येथील ‘सकाळ’ कार्यालयात सोमवारी (ता. ११) झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी आयुक्त नाईकनवरे यांचे स्वागत केले. शहरातील कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसह वाढती गुन्हेगारी, तरुणांसमोरील समस्या यावर मनमोकळेपणे संवाद साधताना नाशिक शहरवासीयांचे विशेष कौतुकही केले.

आयुक्त नाईकनवरे म्हणाले, की मुंबई, पुण्यानंतर राज्यात नाशिकचे नाव घेतले जाते, ते सांस्कृतिक जडणघडण आणि येथील निसर्गरम्य वातावरणामुळे. व्यक्तिश: शिक्षणामुळे पुण्याशी अधिक संबंध आल्यामुळे नाशिकमध्ये आल्यानंतर त्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. अलीकडे पुणे-मुंबईत हिंदीचा प्रभाव वाढत आहे, तसा नाशिकमध्ये तो जाणवत नाही. उलट येथे असलेली परभाषिक सहज मराठी बोलतात, याचाही विशेष आनंद वाटतो..

कायदा सुव्यवस्था अबाधित

शहरात काही दिवसांत खुनाच्या घटना घडल्या. परंतु यात एकही घटना गुन्हेगारी टोळी वा त्याच्याशी संबंधित नाहीत. ज्या घटना घडल्या त्या कौटुंबिक कलह, मित्रांमधील वाद आणि किरकोळ कुरापतीतून घडल्या आहेत.

अनेक घटनांमागे अनैतिक संबंध, गृहकलह, आर्थिक व्यवहार, सूडाची भावना, कौटुंबिक वाद अशी कारणे तपासात समोर आली आहेत. या गुन्ह्यांची उकल होऊन संशयितही अटकेत आहेत. तरीही शहरात अशा घटना घडूच नये, यासाठी रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. नाकाबंदी, मध्यरात्रीनंतर कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध, टवाळखोरांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांसमक्ष समज देणे असे उपक्रम पोलिस ठाणेनिहाय सुरू केले आहेत.

पोलिसांनाही नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस ठाण्याकडे येणाऱ्या नागरिकांची समस्या सोडविण्याची भूमिका राहिली, तर सुसंवाद सहज साधला जाऊ शकतो, अशी भूमिका श्री. नाईकनवरे यांनी मांडली.

तरुणांनी लक्ष्य साध्य करावे

प्रत्येकाचा एक रोडमॉडेल असतो. परंतु तो वयानुरूप बदलत असतो. तरीही आई-वडील आपले रोडमॉडेल मानून प्रवास सुरू केला, तर यश नक्की मिळते. परंतु पालकांकडूनही मुलांना सहज साधने उपलब्ध करून दिल्याने त्याचाही दुष्परिणाम होतो.

त्यामुळे तरुणांनीच आपले करिअर निश्‍चित करून ते साध्य करण्यासाठी ठोस भूमिका घेतली पाहिजे. करिअरच्या मुख्य वळणावर काही बाबींचा त्याग करता आला पाहिजे. अवतीभवती अनेक प्रलोभने असतात. अशा प्रलोभनांना बळी न पडता अभ्यासपूर्ण मेहनत घेण्याची तयारी तरुणांनी ठेवली पाहिजे.

मोबाईल, रिलेशनशिप्स यापासून दूर राहिलात तर महत्त्वाकांक्षा साध्य होतेच. अन्यथा सर्वसाधारण आयुष्य व्यथित करण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. ही चूक उमगते, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे तरुणांनी आजच्या स्पर्धेच्या काळात नियोजनबद्धरीत्या अभ्यासाची तयारी केली, तर त्यांची हमखास स्वप्नपूर्ती होते.

Speaking on Coffee with Sakal Nashik Commissioner of Police Jayant Naiknavare & Dr. Rahul ranalkar
Nashik Crime : 2 लाखाचा गांजा जप्त; दोघांना अटक

खबरदारी घेतली तर...

पारंपरिक आर्थिक गुन्हेगारी मागे पडली असून, ऑनलाइन आर्थिक गुन्हेगारी वाढली आहे. त्यासाठी आपण स्वत: जबाबदार आहोत. मोबाईलचा वापर हा संवादासाठी आहे. स्मार्ट फोन आहे म्हणून आपण त्यावरच आर्थिक व्यवहार करताना विसंबून राहता कामा नये.

आर्थिक व्यवहार करताना खबरदारीही घेतली पाहिजे. अनोळखी फोन कॉल टाळायले हवेत, कोणत्याही अनोळखी मेसेजला रिप्लाय देऊ नये, कोणीही तुमची गोपनीय माहिती विचारत असेल, तर देऊ नये, ओळखीच्याच व्यक्तीशीच ऑनलाइन व्यवहार करावेत, कोणत्याही ऑनलाईन जाहिरातीच्या प्रलोभनांना बळी न पडता आर्थिक व्यवहार करू नये, यासारख्या चुका टाळल्या, तर ऑनलाइन फसवणुकीची शक्यताच राहत नाही.

कोणतीही सरकारी कार्यालये ऑनलाइनवरून आपल्या ग्राहकांशी संपर्क साधत नाही, असा संपर्क होत असेल, तर ग्राहकांनी त्याची शहानिशा केली पाहिजे. सायबर पोलिसांकडून वारंवार याबाबत जनजागृती केली जाते. तरीही सुशिक्षित नागरिकही अशा ऑनलाइन भामट्यांच्या जाळ्यात अडकतात आणि फसवणूक होते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Speaking on Coffee with Sakal Nashik Commissioner of Police Jayant Naiknavare & Dr. Rahul ranalkar
NAMCO बँकेला रिझर्व्ह बँकेकडून 50 लाखाचा दंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com