leopard(Bibtya) esakal
नाशिक

बिबट्या मादी जेरबंद मात्र नर बिबट्याची दहशत कायम

वन विभागाने बिबट्या ताब्यात घेऊन त्याची वन उद्यानात रवानगी केली. मात्र बिबट्या मादीबरोबर असलेला नर बिबट्या, तसेच दोन बछडे ग्रामस्थांनी पाहिल्याने दहशत कायम आहे.

विजय वाकचौरे

शहा (जि. नाशिक) : शहा परिसरात दहशत पसरविणारी बिबट्या मादी अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे. मात्र, त्यासोबत असलेला नर बिबट्या व दोन बछडे स्थानिक रहिवाशांच्या पाहण्यात आल्याने परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे. (female leopard captured at Shaha)

बिबट्याची वन उद्यानात रवानगी

शहा-कोळगाव रस्त्यादरम्यान असलेल्या सोनवणे मळ्यालगत सोपान राहणे यांचे उसाचे क्षेत्र आहे. या ठिकाणी वन विभागाने चार-पाच दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सावज म्हणून कोंबड्या सोडण्यात आल्या होत्या. सावजाच्या शोधात बिबट्या मादी रात्री सातच्या सुमारास पिंजऱ्याजवळ आली. पिंजऱ्यामध्ये प्रवेश करताच बिबट्या मादी पिंजऱ्यात अडकली. पिंजऱ्यात अडकताच मादी डरकाळ्या फोडू लागल्याने स्थानिक रहिवाशांनी धाव घेतली असता, त्यात बिबट्या अडकल्याचे लक्षात आले. याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. रात्री अकराच्या दरम्यान वन विभागाने बिबट्या ताब्यात घेऊन त्याची वन उद्यानात रवानगी केली. मात्र बिबट्या मादीबरोबर असलेला नर बिबट्या, तसेच दोन बछडे ग्रामस्थांनी पाहिल्याने दहशत कायम आहे. वन विभागाने या भागात पिंजरा लावून या जोडीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सोपान राहणे, रवी चंद्रे, रावसाहेब वाणी, गोरक्षनाथ सोनवणे आदींनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT