नागरिकांनो! बाहेर फिरणं बंद करा, अन्यथा घरात येऊन घेतली जाणार 'कोरोना टेस्ट'

Corona Test
Corona Testesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : कोरोनाबाधिताच्या (Corona Patient) संपर्कातील 'हाय रिस्क' आलेल्या नागरिकांच्या त्यांच्या घरी जावून कोरोना टेस्ट (Corona Test) करण्यास पालिकेने आजपासून प्रारंभ केला. रविवार व शुक्रवार पेठेतील बाधितांच्या घरी जावून पालिकेच्या पथकाने कोरोनाच्या टेस्ट केल्या. काही ठिकाणी विरोध झाला. मात्र, पालिकेने सक्तीने टेस्ट केल्याच. (Corona Test By Visiting Corona Patient Home At Karad Satara Marathi News)

Summary

कोरोनाबाधिताच्या संपर्कातील 'हाय रिस्क' आलेल्या नागरिकांच्या त्यांच्या घरी जावून कोरोना टेस्ट करण्यास पालिकेने आजपासून प्रारंभ केला आहे.

शहरात बाधित व त्याच्या संपर्कात येणारे सुपर स्प्रेडर (Super Spreader) ठरताना दिसत आहेत. काही बाधित बाहेर फिरत असल्याचे समोर आल्याने पालिकेने बाधितांच्या घरी जाऊन त्यांच्या संपर्कातील हाय रिस्कच्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. नागरी आरोग्य केंद्राची कोरोना चाचणी पथक त्यासाठी तयार केले आहे. रूग्णवाहिकेसह पथक शहरातील बाधितांच्या घरी जाऊन कोरोना चाचणी करत आहे. कोरोना बाधितांच्या अति सहवासात आलेल्या त्यांच्या घरातील सर्वांच्या चाचण्या त्यांच्या घरीच होत आहेत. पालिका मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचीही परवानगी घेण्यात आली आहे.

Corona Test
कऱ्हाडात शेतमालाचे कोट्यवधींचे नुकसान; लॉकडाउन, चक्रीवादळात पिकं भुईसपाट

शहरात बाधितांच्या अति सहवासात आलेल्यांनी कोरोना टेस्ट कराव्यात, असे आवाहन पालिका करत आहे मात्र, त्याला कोणीच जुमानत नसल्याने बाधितांच्या कुटुबीयांसह त्याच्या अति सहवासातील लोकांच्या कोरोना टेस्ट घरी जावून करण्याचा निर्णय प्रत्यक्षात अमंलबजावणीत आणला आहे. आज सकाळीच पालिकेचे पथक त्यासाठी तयार ठेवले होते. त्यानुसार पालिकेने रविवार व शुक्रवार पेठेतील बाधितांच्या घरी जावून तपासणी केली. दुपारपर्यंत सुमारे 25 जणांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी केली. नागरी आरोग्य केंद्राच्या अनिता पवार, पालिका कर्मचारी पंकज काटरे, शुभम कांबळे, प्रणयजीत कांबळे, प्रसाद जाधव, प्रसाद कांबळे, सोहेब मुल्ला, ओमकार भोकरे, सतेज पाटील, विक्रम तुळसनकर, अशोक डाईंगडे, कुंदन लादे, संजय शिंदे, आरोग्य सेवक उज्वल खेडकर, आरोग्य सेविका सोनाली जाधव, आशा वर्कर पोर्णिमा सपाटे, ज्योती नाथ आदी कोरोना चाचणीसाठी कार्यरत आहेत.

नारायणवाडीच्या डॉक्‍टरनंतर रेठरेच्या बोगस डॉक्‍टरचा पर्दाफाश

Corona Test By Visiting Corona Patient Home At Karad Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com