Fight Sakal
नाशिक

नाशिक : टोलनाक्यावर तृतीयपंथी- वाहन चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिक-सिन्नर महामार्गावर असणार्‍या शिंदे जवळ टोलनाक्यावर दुपारी तीनच्या सुमारास तृतीयपंथीय व तीन वाहक संचालकांमध्ये पैशाच्या कारणावरून फ्री-स्टाईल हाणामारी झाली यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती टोल प्रशासनाने तृतीयपंथी यांचा त्रास होत असल्याचे पत्र नाशिकरोड पोलिस स्टेशनला दिले असून पुढील कारवाई पोलिस करीत आहेत.

नाशिक सिन्नर टोल वेज लिमिटेड या शिंदे येथे असणाऱ्या टोल नाक्यावर पैसे मागण्याच्या कारणावरून तृतीयपंथीय आणि तीन वाहनचालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. या वेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यासंदर्भात नाशिक सिन्नर टोल वेज लिमिटेड या कंपनीने पोलिस प्रशासनाला पत्र देऊन किन्नर लोकांचा त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. दरम्यान तीन वाहनचालक गाडी नाक्यावरच सोडून निघून गेल्याचे टोल व्यवस्थापनाने सांगितले आहे.

किन्नर वाहनचालकांकडून बळजबरी पैसे मागून त्यांना त्रास देतात शिवाय पैसे दिले नाही तर मारहाण करतात अशी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास नाशिक रोड पोलिस करत आहेत.

आम्ही घटनेचे सी सी टी व्ही फुटेज पोलीस विभागाला दिले असून पत्राद्वारे किन्नर बांधवांचा जाच कमी करण्याची विनंती केली आहे. - नानक लूल्ला, टोल मॅनेजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT