while accepting the coconut for next year's program from Yashoda Akka in the rotating coconut program held here. MP Dr. Subhash Bhamre, Dr. Seshrao Patil and villagers esakal
नाशिक

Nashik News : फिरत्या नारळाचा आगामी वर्षांचा बहुमान चिराईला! तिसऱ्यांदा होणाऱ्या कार्यक्रमाची उत्सुकता

उत्तर महाराष्ट्रातील धार्मिकदृष्ट्या अग्रणी सोहळा समजल्या जाणाऱ्या फिरत्या नारळाच्या आगामी वर्षाच्या कार्यक्रमाचा बहुमान चिराई (ता. बागलाण) ला मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नरकोळ : उत्तर महाराष्ट्रातील धार्मिकदृष्ट्या अग्रणी सोहळा समजल्या जाणाऱ्या फिरत्या नारळाच्या आगामी वर्षाच्या कार्यक्रमाचा बहुमान चिराई (ता. बागलाण) ला मिळाला आहे.

या गावात तिसऱ्यांदा होणाऱ्या या सोहळ्याविषयी मोठी उत्सुकता आहे. ग्रामस्थांनी आतापासूनच नियोजन व तयारी सुरु केली आहे. (firta naral coming at chirai years Eagerness of program to be held for third time Nashik News)

गुरूवर्य (वै.) कृष्णा माऊली जायखेडा यांच्या प्रेरणेने व यशोदा अक्का यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराज पदयात्रा निमित्ताने हा कार्यक्रम होत असतो. वारंकरी संप्रदायाची पताका गावागावात फडकावी हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे.

या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण होते. गुरुवर्य कृष्णा माऊली यांनी १९७० ला याच गावापासून कार्यक्रमाची सुरवात केली. यावर्षी तिसऱ्यांदा हा कार्यक्रम होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झालेली आहे.

यानिमित्त पालखी मिरवणूक, रिंगण सोहळा, हरिपाठ, कीर्तन आदींसह महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. यावर्षी केरसाणे येथे झालेल्या कार्यक्रमात चिराई ग्रामस्थांनी यशोदा अक्का यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नारळ घेतले.

यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, डॉ. शेषराव पाटील, मनोहर आहिरे, पंडित अहिरे, विश्वास अहिरे, दीपक अहिरे, दिलीप अहिरे, दादाजी अहिरे, हभप लहू महाराज आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फिरत्या नारळाचा जन्मच चिराईला

उत्तर महाराष्ट्र कसमा पट्ट्यात वैभवात भर टाकणारा फिरता नारळाचा कार्यक्रम चिराई या गावापासून १९७० पासून सुरवात झाली. त्यानंतर १९८४ तर ५१ वा सोहळा डिसेंबर २०२४ ला तिसऱ्यांदा याच गावात होत आहे. ही ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब आहे.

"फिरत्या नारळाच्या कार्यक्रमामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते. गुरुवर्य कृष्णा माऊली यांनी लावून दिलेली ही परंपरा सुरू राहावी या उद्देशाने गावागावात या कार्यक्रमासाठी चढाओढ असते. आम्ही ग्रामस्थांनी तिसऱ्यांदा हा कार्यक्रम घेत असल्याने गावाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे." - शकुंतला पाटील, सरपंच चिराई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT