
Nashik News : मागील दोन वर्षांपासून प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या पेठ रोड काँक्रिटीकरणाच्या ४५ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला असून, फेब्रुवारीअखेर रस्त्याच्या कामाला सुरवात होईल.
त्यामुळे आचारसंहितेच्या कात्रीत काम अडकण्याची शक्यता दुरावली आहे. (work of Peth Road will start at end of February nashik news)
रस्त्याच्या कामासंदर्भात महापालिकेकडून चालढकल केली जात होती. आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रस्ताव गतीने पुढे सरकला आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी या विषयावर विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला. त्यानुसार नगरविकास खात्याने जून २०२३ पूर्वी डांबरीकरणाचे आदेश दिले. मात्र महापालिकेने निधी नसल्याचे कारण चालढकल केली.
पावसाळी अधिवेशनात हक्कभंग दाखल करण्याची तयारी केल्यानंतर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार बांधकाम विभागाने ४५ कोटी रुपयांची तरतूद करून निविदा प्रक्रिया राबविली. सदरचे काम बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले. यासंदर्भातील कार्यारंभ आदेश देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर करण्यात आला. स्थायी समितीच्या सभेत रस्ते कामाला मंजुरी मिळाली.
येत्या आठ दिवसात कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आत पेठ रोडच्या सहा किलोमीटरच्या रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाला मुहूर्त लागणार आहे. या कामासाठी आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी पाठपुरावा केला. सार्वजनिक बांधकाम विभागास जिल्हा नियोजन समितीकडे निधीसाठी पाठपुरावा केला.
स्मार्टसिटीच्या माध्यमातून देखील रस्ते तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. आता महापालिकेने डांबरीकरण करण्याऐवजी ४५ कोटी रुपये खर्च करून काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. रस्ते कामासाठी साधारण दीड वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
''स्थायी समितीच्या मंजुरीनंतर आता रस्ता काँक्रिटीकरणाला मुहूर्त लागणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतं होता. ती समस्या आता दूर होईल.''- ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.