Folk Artists esakal
नाशिक

Nashik News : लोककलावंतांना मिळणार विशेष आर्थिक मदत! 31 पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचानालय विभागाच्या नव्या परिपत्रकानुसार कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लोककलावंतांना कलाकारांना आर्थिक मदत ५००० रुपये जाहीर केली असून ज्या कलाकाराच वय ३० वर्षाच्या पुढे असणाऱ्या लोक कलावंतांनी एकल कलाकारांसाठी एकरकमी विशेष कोविड अनुदान पॅकेजसाठी लवकरात लवकर तालुक्याच्या तहसील कार्यालय व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे आपले अर्ज पूर्ण भरून दोन्ही ठिकाणी द्यावेत,असे आवाहन शाहीर उत्तम गायकर यांनी केले आहे. (Folk artists will get special financial help Call for applications till 31st Nashik News)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

या अर्थिक मदतीकरिता विहित नमुन्यातील अर्ज, १५ वर्ष महाराष्ट्रातील वास्तव्याचा दाखला, ५० हजार रुपयेच्या आतील उत्पन्नाचा दाखला, कलाक्षेत्रातील १५ वर्षे कार्यरत असल्याचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, शिधापत्रिका व प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे.

याकरिता शेवटची मुदत ३१ जानेवारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे मानधन घेणाऱ्या कलावंतांनी अर्ज करू नये तसेच याबाबत अधिक माहितीसाठी ९८५०६५४०८४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शाहीर उत्तम रामचंद्र गायकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT