Teacher transfers
Teacher transfersesakal

Nashik News : बदलीसाठी शिक्षकांचा शाळा भेटीवर धडाका! बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात

कंधाणे (जि. नाशिक) : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बदली अंतिम टप्प्यात असून चार पैकी तीन संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत.

परंतु सर्वाधिक बदलीपात्र असलेल्या संवर्ग चार मधील शिक्षकांसाठी ये-जा करण्याच्या दृष्टीने आपल्या तालुक्यात किंवा शहराजवळ रिक्त जागा कमी व अपरिचित असल्याने चांगल्या शाळेत बदलीसाठी फॉर्म भरण्यापूर्वी शिक्षकांकडून प्रत्यक्ष शाळा भेटीचा धडाका सुरू आहे. (Teachers strike school visit for transfer In final stage of transfer process Nashik News)

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्याबाबत शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयान्वये वेळापत्रक जाहीर केले. त्याप्रमाणे कोरोनामुळे दोन वर्षे रखडलेली बदली प्रक्रिया सुरू झाली. नवीन विकसित केलेल्या सॉफ्टवेअर प्रणालीनुसार राज्यात हजारोंच्या संख्येने शिक्षकांच्या बदल्या झाल्या.

शासनाने जाहीर केलेल्या निकषानुसार कार्यरत शाळेवर सर्वसाधारण क्षेत्रात सलग पाच वर्षे व तालुक्यात दहा वर्षे पूर्ण झालेले सर्व शिक्षक बदलीपात्र असून अपंग दुर्धर आजार विधवा यांचा संवर्ग एक व पती पत्नी एकत्रीकरण संवर्ग दोन आणि अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांचा संवर्ग तीन मधून टप्प्याटप्प्याने दिलेल्या मुदतीत बदली पोर्टलवर प्राधान्यक्रमाने बदली हवी असलेल्या जास्तीत जास्त तीस शाळांचा पर्याय फॉर्म भरून घेत संवर्गनिहाय बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

आपली बदली कोणत्या शाळेत झाली याची माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे. सेवाज्येष्ठता व विशेष संवर्गातून प्रथम प्राधान्य मिळाल्याने बदली झालेल्या शिक्षकवर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Teacher transfers
Nashik News : अनाथालयातील लेकरांना पोलिसांनी घडवली यात्रा; अप्पर पोलिस अधीक्षक भारती यांचा पुढाकार

शिक्षकांकडून शाळा भेटीवर जोर

परंतु बदली प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात संवर्ग चार मधील कुटुंबापासून दूर दुर्गम भागात जेथे दळणवळणाची सुविधा नाही. अशा ठिकाणी खितपत पडलेल्या शिक्षकांना आपल्या तालुक्यातील गाव किंवा शहराजवळील शाळेत बदली करून घेण्यासाठी संख्येने जास्त असलेल्या संवर्ग चार मधील बदलीपात्र शिक्षकांचा बदलीचा ऑप्शन फॉर्म भरण्याआधी उपलब्ध रिक्त जागा व अपरिचित गावांतील शाळेचे आपल्या नियोजित राहण्याच्या ठिकाणापासून अंतर शाळेची पटसंख्या विद्यार्थी उपस्थिती कार्यरत शिक्षक शालेय इमारत व परिसर तसेच गावातील राजकीय परिस्थिती आणि नागरिकांचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन अशी आवश्यक माहिती प्रत्यक्ष भेटीतून किंवा सहकाऱ्यांकडून फोनद्वारे माहिती घेत आहेत.

"नाशिक जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांपैकी कसमादे तालुक्यातील शिक्षकांची संख्या अधिक असून त्यांच्याकडून व २०१८ मध्ये बदली प्रक्रियेत विस्थापित होऊन अन्य विशेषतः पेठ सुरगाणा व कळवण तालुक्यात बदली झालेले शिक्षक आगीतून निघून फुफाट्यात पडू नये यासाठी रिक्त जागा असलेल्या शाळांना भेटी देण्यावर भर दिला जात आहे."

- मनोज पगार, सरचिटणीस बागलाण तालुका प्राथमिक शिक्षक समिती

Teacher transfers
SAKAL Exclusive : ST बसची स्टिअरिंग मार्च महिन्यापासून महिलांच्या हाती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com