MUHS
MUHS esakal
नाशिक

आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी होणार मुलाखती

अरूण मलाणी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या (Maharashtra University of Health Sciences) कुलगुरूपदाच्‍या निवडीसाठी मुलाखत प्रक्रियेला वेग आला असून, १८ ते २० जूनदरम्‍यान मुंबईतील मल्‍हार हिल्‍स परिसरातील सह्याद्री या शासकीय विश्रामगृहावर मुलाखती होणार आहेत. त्‍यामूळे जूनअखेर कुलगुरूपदाच्‍या नावावर शिक्‍कामोर्तब होऊन नाव जाहीर होण्याची शक्‍यता आहे. (For-post-Vice-Chancellor-University-Health-Sciences-interviews-nashik-marathi-news)

निवड प्रक्रियेला वेग; महिनाअखेर शिक्कामोर्तब शक्‍य

डॉ. दिलीप म्‍हैसेकर यांच्‍या कुलगुरूपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्‍याने ही निवडप्रक्रिया राबविण्यात येत आहे. तत्‍पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांच्‍याकडे प्रभारी कारभार सोपविलेला आहे. यादरम्‍यान कुलगुरूपदासाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता. त्‍यानुसार मुलाखतीची प्रक्रिया निश्‍चित करण्यात आली होती. २४ व २५ एप्रिलला मुलाखती घेण्याचे नियोजन होते. मात्र, या कालावधीत कोरोना महामारीचा राज्‍यभरात प्रादुर्भाव वाढला होता. त्‍यामुळे मुलाखत प्रक्रिया पुढे ढकलत असल्‍याचे जाहीर करण्यात आले होते. आता परिस्‍थिती सुरळीत होत असताना वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या लेखी परीक्षांचीही घोषणा करण्यात आली. त्‍यापाठोपाठ आता कुलगुरूपद निवडीच्‍या प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे. येत्‍या १८, १९ आणि २० जून असे तीन दिवस मुंबईत मुलाखत प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यानंतर राज्‍यपालांकडे साधारणतः पाच नावांची शिफारस केली जाईल. त्‍यातून राज्‍यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती हे कुलगुरूंच्‍या नावाची घोषणा करतील. जूनअखेर ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.

तीस उमेदवारांचा प्रक्रियेत सहभाग

पूर्वी समितीमार्फत प्राप्त ३५ अर्जांपैकी १९ अर्जांची निवड मुलाखत प्रक्रियेसाठी झाली होती. मात्र, १४ एप्रिलला सुधारित परिपत्रक जारी केले होते. त्‍यानुसार ३० उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविले होते. त्‍यामुळे आता या ३० उमेदवारांचा मुलाखत प्रक्रियेत सहभाग असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT