गोदा प्रदूषणमुक्तीच्या नावाने होऊ द्या खर्च..!

godavari river
godavari riveresakal

नाशिक : जगभर नाशिकची ओळख करून देणाऱ्या गोदावरी नदी (godavari river) प्रदूषणमुक्तीसाठी पाच वर्षांत पंचवीस कोटी रुपये महापालिकेने स्वच्छतेवर खर्च केले. परंतु अजूनही शंभर टक्के शुद्धीकरण होत नसल्याची बाब समोर आली आहे. खर्चासाठी तर तजवीज नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. (spending-25-crore-in-five-years-for-godavari-river-nashik-marathi-news)

पाच वर्षांत २५ कोटी खर्चूनही पूर्ण मुक्ती नाही

५ जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना नाशिककरांसाठी जीव की प्राण असलेल्या गोदावरीसह शहरातून वाहणाऱ्या नंदिनी, दारणा, कपिला व वाघाडी नदीचा प्रश्‍न समोर आला आहे. नाशिक शहरातून गोदावरी नदीचा प्रवास १९ किलोमीटरचा आहे. नंदिनी सोळा, तर दारणा नदीचा प्रवास साडेतीन किलोमीटरचा आहे. एकेकाळी नदी असलेल्या कपिला व वाघाडीला नाल्याचे स्वरूप आले आहे. गोदावरी नदीमध्ये शहरातच विलीनीकरण होत असल्याने गोदावरी नदीचा भाग म्हणूनच पाहिले जाते. टाकळी गावात नंदिनी गोदावरीला मिळते. गोदावरी नदीवर सिंहस्थ कुंभमेळा भरत असल्याने जगभर नाशिकचे नाव पोचले आहे. त्यामुळे गोदावरी नदीचे महत्त्व नाशिककरांसाठी महत्त्वाचे असल्याने त्यापार्श्‍वभूमीवर प्रदूषणमुक्तीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककर झगडत आहेत.

‘सकाळ’मुळे प्रश्‍न ऐरणीवर

गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी ‘सकाळ’ने जनआंदोलन उभारल्यानंतर प्रदूषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला व महापालिका प्रशासनाने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली. उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेने प्रशासनाचे कान उपटल्यानंतर निरी या केंद्रीय संस्थेच्या सूचनेवरून स्वच्छता मोहीम सुरू आहे. पानवेली हटविणे, गोदावरी नदीला मिळणारे नाले बंद करणे, कारखान्यांचे केमिकलयुक्त पाणी बंद करणे, चोवीस तास पोलिसांचा पहारा ठेवणे, नदीपात्रामध्ये कपडे, जनावरे, वाहने धुण्याला बंदी घालणे, नैसर्गिक स्रोत टिकवून ठेवण्यासाठी काँक्रिटीकरण न करणे, सिमेंट व काँक्रिटची भिंत न उभारता गॅबियन पद्धतीची भिंत बांधणे आदी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

विशेष कक्ष स्थापण्याच्या सूचना

गोदावरी संवर्धनासाठी विशेष कक्ष स्थापण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाच वर्षांपासून यावर महापालिका काम करत आहे; परंतु अद्याप पूर्णपणे गोदावरी प्रदूषणमुक्त झालेली नाही. २०१५ पासून गोदावरीसंवर्धन, जनजागृती मोहीम, पानवेली काढणे, घाट सुशोभीकरण, आकस्मिक खर्च, नदी साफसफाई सुमारे चौदा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. त्याव्यतिरिक्त पानवेली व गाळ हटविण्यासाठी साडेआठ कोटी रुपयांचे रोबोट यंत्र खरेदी करण्यात आले. पानवेली हटविण्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च करून ट्रिमिंग यंत्र खरेदी करण्यात आले. एवढा खर्च होऊनही अद्यापही शंभर टक्के प्रदूषणमुक्ती झाली नाही.

godavari river
महापौर साहेब! असं आमचं काय चुकलं हो! सिडकोवासियांची आर्त हाक

...असा झाला खर्च

वर्ष खर्च (रुपयात)

२०१५-१६ ५५.३५ लाख

२०१६-१७ ३९.२१ लाख

२०१७-१८ एक कोटी २९ लाख ६१ हजार

२०१८-१९ तीन कोटी ६१ लाख

२०१९-२० आठ कोटी ८५ लाख

२०२०-२१ ३६.१६ लाख

godavari river
आदिवासी भागात शंभर टक्के लसीकरणाचे आव्हान

ही आहेत प्रमुख कारणे

- बापू पुलाच्या वरील बाजूला रसायनमिश्रित पाणी मिसळते

- पावसाळी गटारींना ड्रेनेजच्या लाइन जोडणे

- मल-जल शुद्धीकरण केंद्रात सांडपाण्यावर पूर्ण प्रक्रिया न होणे

- ड्रेनेज फोडून शेतीसाठी पाण्याचा वापर करणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com