Eco cars that went down the drain.  esakal
नाशिक

Nashik Accident News : बाभुळगाव शिवारात चारचाकीचा अपघात; 11 जखमी

मनमाडकडून शिर्डीच्या दिशेने येत असलेली प्रवासी वाहतूक करणारी इको कार बाभुळगाव शिवारात आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन...

सकाळ वृत्तसेवा

येवला : प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको कारचा येवल्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात ४ बालकांचा समावेश असल्याची माहिती आहे. (Four wheeler accident in Babhulgaon Shivar 11 injured Nashik News)

बुधवारी (ता. ३१) पहाटे मनमाडकडून शिर्डीच्या दिशेने येत असलेली प्रवासी वाहतूक करणारी इको कार बाभुळगाव शिवारात आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार थेट बाभुळगाव शिवारातील नाल्यात जाऊन पडली.

यात कारने तीन-चार वेळा उलटल्यामुळे कारमधील ११ जण गंभीया जखमी झाले आहेत यात चार बालकांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच खासगी रुग्णवाहिकेद्वारे जखमींना उपजिल्हा रुग्णालय व येवल्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे एकाला नाशिकला, तर एकाला लोणी येथे पाठविण्यात आल्याचे समजते. दरम्यान, चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT