Car parking on holkar bridge esakal
नाशिक

होळकर पुलावर चारचाकी वाहनांचे पार्किंग; रविवार कारंजावरील वाहतूक कोंडीत भर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील अनधिकृत पार्किंगमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असताना, त्यात आता गोदावरी नदीवरील होळकर पुलावरच चारचाकी वाहनांचे अनधिकृत पार्किंग थाटले आहे.

रविवार कारंजाकडून पंचवटी कारंजाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील होळकर पुलावर अनधिकृतरीत्या चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जात आहे. यामुळे रविवारी कारंजा येथील वाहतूक कोंडीवर अधिकचीच भर पडते आहे. (Four wheeler parking at Holkar Bridge Add to traffic jam at raviwar karanja nashik latest marathi news)

रविवार कारंजा येथे वाहनांच्या रहदारीमुळे आधीच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. त्यात होळकर पुलावरील पार्किंगची भर पडली आहे. गोदावरी नदीवर नवीन होळकर पुलावरील पादचारी रस्त्याच्या बाजूला एका रांगेत चारचाकी वाहने पार्क केल्या जात आहेत. यामुळे पुलावरील रस्त्यांची रुंदी कमी होऊन वाहतुकीला ही वाहने अडथळा ठरत आहेत.

विशेषत: या पुलावर चारचाकी वाहने तर पार्क करतातच, पण बाहेरगावाहून आलेल्या ट्रॅव्हल्सही पार्क केल्या जात आहेत. या प्रकारामुळे रविवार कारंजाकडून पंचवटी कारंजाकडे येणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा होऊन यामुळे परिणाम रविवारी कारंजावर वाहतूक कोंडीत होतो आहे. शहर बसेसला अडथळा झाल्यास सारी वाहतूकच खोळंबून राहते.

मुख्यत: रविवार कारंजा येथे वाहतूक नियोजनासाठी दोन ते चार वाहतूक पोलिस नेहमीच नियुक्तीवर असतात. परंतु, या पोलिसांकडून होळकर पुलावर अनधिकृत पार्क करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. मात्र याचा हकनाक त्रास कोंडीत सापडलेल्या वाहनचालकांना होतो आहे. त्यामुळे होळकर पुलावर पार्क करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT