नाशिक

Nashik Bribe Crime: 1 कोटींच्‍या लाचप्रकरणातील गणेश वाघ जेरबंद; लाचलुचपतच्‍या नाशिक पथकाने केले अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : नगर येथील औद्योगिक विकास महामंडळाच्‍या अधिकाऱ्यांना तब्‍बल १ कोटींची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते. (Ganesh Wagh jailed in 1 crore bribery case nashik crime news)

या घटनेतील फरार असलेला सहआरोपी व सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, धुळे येथे कार्यकारी अभियंतापदावर कार्यरत गणेश लक्ष्मण वाघ यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. एसीबीच्‍या नाशिक पथकाने काल (ता.१४) अटक केली असून, न्‍यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्‍या नगर उपविभागातील सहायक अभियंता अमित किशोर गायकवाड यास ३ नोव्‍हेंबरला १ कोटी रुपये लाचेची रक्‍कम स्‍विकारताना पकडण्यात आले होते. त्‍याच्‍याविरुद्ध नगर जिल्‍ह्‍यातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला होता.

या कारवाईतील सहआरोपी व सध्या औद्योगिक विकास महामंडळ, धुळे येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत गणेश लक्ष्मण वाघ हा गुन्‍हा दाखल झाल्‍यापासून फरार होता. नाशिक विभागाचे पथक सातत्‍याने शोध घेत असताना काल (ता.१४) नाशिक पथकाचे पोलिस निरीक्षक स्‍वप्‍निल राजपूत व त्‍यांच्‍या पथकाने ताब्‍यात घेतले.

यानंतर नगर येथील जिल्‍हा व सत्र न्‍यायालयात हजर केले असता न्‍यायालयाने चौकशीसाठी रविवार (ता.१९) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक स्‍वप्‍निल राजपूत, पोलिस नाईक किरण धुळे, संदीप हांडगे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: ₹15 हजारांचे होऊ शकतात ₹20 हजार! 33% GMP सह 631 कोटींचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

Mumbai Electricity: मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा प्रशासनावर संताप; आंदोलनाचा इशारा

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

फक्त एका ट्रिकने Instagram हॅक! Meta AI मधील त्रुटीचा गैरवापर; लाखो अकाउंट्सवर हॅकर्सचा हल्ला, सुरक्षेसाठी लगेच करा 'हे' काम

सचिन पिळगावकरांवर जीवापाड प्रेम करायची ही अभिनेत्री; पण 'या' व्यक्तीमुळे नाही होऊ शकलं लग्न, अखेर...

SCROLL FOR NEXT