gautami patil, gautami patil video, gautami patil video viral SAKAL
नाशिक

Gautami Patil : 'त्या' व्हायरल व्हिडिओवर गौतमी पाटील पहिल्यांदा बोलली! म्हणाली...

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत एका २६ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिस कारवाई करत आहेत. महिला आयोगाने देखील या प्रकरणात लक्ष घातले असून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. 

गौतमी पाटील आज नाशिकमध्ये आहे. कार्यक्रमापूर्वी तिने माध्यमांशी संवाद साधला. मला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचे प्रेम मला मिळत आले आहे. लोकांची मला साथ आहे. या गोष्टीचा मला अभिमान वाटतोय. 

व्हायरल व्हिडिओवर गौतमी म्हणाली, या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू आहे. याप्रकरणी मी जास्त बोलणार नाही. महिला आयोगाने देखील याची दखल घेतली, याचे मला चांगले वाटले. रूपाली चाकणकर यांनी दखल घेतली. त्यांनी ताबडतोड कारवाई करण्याचे सांगितले त्यामुळे मला छान वाटले. 

गौतमी पाटील वेगवेगळ्या ठिकाणी लावणी नृत्य सादर करते. एखाद्या स्टारप्रमाणेच तिची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग आहे. एका कार्यक्रमात गौतमी परफॉर्मन्सपूर्वी कपडे बदलत होती, तेव्हा कोणीतरी तिचा व्हिडिओ शूट केला होता. याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. 

याप्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही ट्विटरवर पोस्ट केली होती. त्यांनी पोस्टमध्ये सांगितले की, आयोगाने पोलिसांना महिलांवर होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी कृती कार्यक्रम जाहीर करण्यास सांगितले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT