Raj Thackeray girish mahajan esakal
नाशिक

Girish Mahajan : राज ठाकरे सोबत आल्यास युतीचा फायदाच; गिरीश महाजन यांची स्पष्टोक्ती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भविष्यात एकत्र येतील, असे भाकीत संजय शिरसाट यांनी वर्तविल्यानंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Girish Mahajan : मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भविष्यात एकत्र येतील, असे भाकीत संजय शिरसाट यांनी वर्तविल्यानंतर ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे आमच्यासोबत आल्यास युतीचा निश्चितपणे फायदा होईल. आम्ही समविचारी पक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.(girish mahajan Statement of If Raj Thackeray comes along alliance will be beneficial nashik news)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, असा मोठा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला. यावर बोलताना महाजन म्हणाले, शिंदेसोबत शिवसेना, अजित पवारांसोबत राष्ट्रवादी आमच्यासोबत आली.

त्यामुळे राज ठाकरे जर सोबत येत असतील तर त्यात काही हरकत नाही. एकीकडे महाविकास आघाडीने धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर अदानींविरोधात मोर्चा काढला, तर दुसरीकडे महाविकासच्या घटक पक्षाचे नेते शरद पवार यांनी अदानींचे आभार मानले. यावर बोलताना महाजन म्हणाले, एकीकडे मोर्चे काढायचे अन् रात्री जाऊन अदानींना भेटायचे, काय चाललंय समजत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आधी एकमत करावे.

रात्रीच्या भेटी घेऊन काही वेगळी बोलणी करत आहे की काय, असा टोलाही त्यांनी लगावला. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून सुरू असलेल्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केले. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न दिल्याने सुरू असलेल्या आरोप- प्रत्यारोपांबाबत ते म्हणाले, की मला त्याबद्दल माहिती नाही.

पत्रिका मिळण्याआधीच काही लोक रोज सकाळी उठून सांगत होते, आम्हाला निमंत्रण मिळाले नाही. त्यांनी निमंत्रणाचे राजकारण केले. प्रमुख राष्ट्रीय पक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे. शिवसेना हा काही राष्ट्रीय पक्ष नाही. त्यांच्याकडे चिन्हही नाही. जर त्यांना निमंत्रण मिळाले असेल, तर मला याबाबत माहीत नाही.

खडसेंना चप्पल घ्यायलाही पैसे राहणार नाही

राम मंदिर आंदोलनात महाजन कोणत्या जेलमध्ये होते, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. याला उत्तर देताना महाजन यांनी खडसेंच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. भोसरी भूखंड प्रकरणी २७ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस, १३७ कोटी रुपयांच्या गौण खनिज उत्खनन प्रकरणात आलेल्या नोटीसमुळे एकनाथ खडसेंची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. इतका दंड झाल्याने आता खडसेंना चप्पल घ्यायलाही पैसे राहणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

काय म्हणाले मंत्री महाजन...

- आठवडा मागे-पुढे होईल, पण आरक्षण देऊ

- ठाकरे सरकारच्या त्रुटी दूर करण्याचे काम आमचे सरकार करतेय

- मोदींच्या दौऱ्यात कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही

- नाशिकमध्ये युवा महोत्सव होत आहे, ही नाशिककरांना मेजवानी असेल

- मोपलवारांनी राजीनामा दिला, याबाबत मला बातम्यांमधून समजले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT