godavari express
godavari express esakal
नाशिक

नाशिककरांची गोदावरी ट्रेन होणार रद्द? आंदोलनाचा इशारा

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : नाशिक रोड- मनमाड- नाशिककरांची (nashik road-manmad) कौटुंबिक गाडी असणारी गोदावरी एक्सप्रेस (godavari express) बंद करण्याचा घाट घातला जात आहे. २२ मार्च २०२० पासून गोदावरी बंद आहे. ही गाडी सुरू करावी, अशी मागणी नाशिककर करीत असून महिनाभरात ही गाडी सुरू केली नाही तर सामान्य नाशिककरांसह प्रवासी संघटना नाशिकरोड आणि मनमाड रेल्वे स्थानकावर आंदोलन करणार असल्याचे नाशिककरांनी सांगितले. प्रवाशांचा प्रतिसाद निम्म्याने कमी झाल्याचे कारण देत मनमाड-एलटीटी गोदावरी ही नाशिकची फॅमिली रेल्वेगाडी बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. गोदावरी रद्द करण्याचा निर्णय झाल्याबाबत ठाऊक नसल्याचे मुंबई रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

नाशिककरांच्या भावनांशी खेळणे बंद करावे

नाशिककरांना मुंबईला जाण्यासाठी हक्काच्या तीन गाड्या आहेत. राज्यराणी सकाळी सहाला, पंचवटी सव्वासातला तर गोदावरी सव्वा नऊला नाशिकरोडला येते. गोदावरी रद्द झाल्याचा संदेश प्रवाशांमध्ये व्हायरल होत आहे. गोदावरी ऐवजी पाटणावरून सुटणारी दुसरी रेल्वे गाडी याच वेळेला सोडण्यात येत असल्याचे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे नाशिककर अस्वस्थ झाले आहेत. नाशिकरांच्या गाड्यांशी म्हणजेच नाशिककरांच्या भावनांशी खेळणे बंद करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

रेल्वेकडून दुट्टपी भूमिका

नाशिकसाठी सुरू झालेली तपोवन वर्षभरापूर्वी नांदेडपर्यंत नेण्यात आली. पुण्याला जाण्यासाठी असलेली मनमाड- नाशिक- पुणे गाडी आता भुसावळवरुन सोडण्यात आली. मुंबईहून मनमाडपर्यंत धावणारी राज्यराणी एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावत आहे. गोदावरी एक्सप्रेस ही मनमाडऐवजी धुळ्यापर्यंत नेण्याची चर्चा होती. आता ती रद्द करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप प्रवासी संघटनेचे राजेश फोकणे, गुर्मीतसिंग रावल यांनी केला आहे.

प्रवाशांची दिशाभूल

मध्य रेल्वेने गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्याचा जो प्रस्ताव दिला त्यात फक्त ५० टक्के पेक्षा कमी प्रवासी गाडीला लाभत असल्याचे कारण देण्यात आल्याचे समजते. ही आकडेवारी फक्त आरक्षित प्रवाशांची आहे. कारण सर्वच गाड्यांमध्ये दैनंदिन प्रवासी तसेच अनारक्षित प्रवाशांना कोरोनाच्या नावाखाली सध्या प्रवेश नाही. म्हणून या संदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा करावा, यासाठी प्रवासी संघटनेच्या लोकांनी गोडसे यांची भेट घेऊन कैफियत मांडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT