नाशिक : इंजिनिअरिंगच्या 7 विद्यार्थ्यांविरूध्द गुन्हा दाखल

engineering students
engineering studentsesakal

सातपूर (नाशिक) : अभियांत्रिकीचे (engineering) शिक्षण घेत असलेल्या तब्बल सात विद्यार्थ्यांविरुद्ध (students) खुनाचा गुन्हा दाखल (crime) झाला आहे. सातपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून नेमके प्रकरण काय आहे याचा उलगडा झाला आहे.

काय घडलं 'त्या' रात्री?

अभियांत्रिकीचे (engineering) शिक्षण घेत असलेल्या सात विद्यार्थ्यांविरुद्ध मित्राच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकमधील एका शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या अंकित दिनकर महानकर (वय २१, रा. साई गार्डन सोसायटी, गुलमोहर कॉलनी, सातपूर) या युवकाचा १५ मार्च २०२० ला मृत्यू झाला होता. संशयित मित्र-मैत्रिणींनी त्याला व्यसनाधीन होण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप अंकितच्या आईने केला आहे. अंकित व्यसन करण्यास नकार देत असल्याने संबंधितांनी त्याच्याशी वेळोवेळी वाद घालून, ठार करण्याची धमकी देऊन त्याला व्यसनाधीन होण्यास प्रवृत्त केले, तसेच त्याचा खून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मृत युवकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशान्वये सातपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दाद न दिल्याने श्रीमती महानकर यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक तुळशीराम राठोड तपास करीत आहेत.

engineering students
येवला प्रांताधिकाऱ्यांची महिला तलाठीकडे शरीरसुखाची मागणी

मृत युवकाच्या आईची तक्रार

ऋचा भारती (रा. खडकी, जि. अकोला), नमित मिश्रा (रा. पवई, मुंबई), दीपककुमार झा व ऋषभराज सिन्हा (दोघे रा. बिहार), लक्ष जस्वाल (रा. छत्तीसगड), मोनिका वळवी (रा. भवानीपाडा, जि. नंदुरबार) व हृषीकेश दराडे (रा. आडगाव, नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित विद्यार्थ्यांची नावे आहेत. या प्रकरणी प्रमिला महानकर (रा. उमरी, जि. अकोला) यांनी तक्रार दिली आहे.

engineering students
पैश्‍यांचा पाऊस पाडण्याचे आमिष; युवतीवर वारंवार अतिप्रसंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com