Grapes Production sakal
नाशिक

Grapes News : द्राक्ष विक्रीसाठी बाजारात दाखल; चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

सकाळ वृत्तसेवा

नैताळे : निफाड तालुक्यात प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, ऊस ,मका, सोयाबीन अशी नगदी पिके घेतली जातात. यामध्ये द्राक्षाचे पीक निसर्गाने साथ दिली तर जास्तीचा आर्थिक फायदा करून देणारे पीक समजले जाते. नैताळे येथील द्राक्ष उत्पादक विजय रामनाथ बोरगुडे यांनी द्राक्ष बागेची आरली फळ छाटणी करून निसर्गाशी दोन हात करून द्राक्ष बाजारात विक्रीला आणली आहे. बाजारात या द्राक्षाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

मागील पाच ते सहा वर्षात तालुक्यातील शेतकऱ्यांची पूर्णतः वाताहत झाली आहे. यातच निसर्गाची अवकृपा व सरकारचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेतकरी अक्षरशः रसातळाला पोचला आहे. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदा द्राक्ष उत्पादक शेतकरी जोमाने कामाला लागले आहेत.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

नैताळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी विजय बोरगुडे यांनी द्राक्ष वेलींची २५ ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी आरली छाटणी केली होती. जास्त दिवस चालणाऱ्या निसर्गाशी दोन हात करत औषधांची वेळोवेळी फवारणी करून कोणत्याही परिस्थितीत आपल्याला द्राक्ष बाग चांगले पिकवायची हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून काम सुरू केले. द्राक्ष बागेसाठी केलेली मेहनत फळाला आली. काळी शरद या जातीच्या द्राक्षाची काढणी सुरू असून द्राक्षला चांगला भाव मिळाल्याचे श्री. बोरगुडे यांनी सांगितले.

''द्राक्षेबागेची आरली छाटणी हा मोठा जुगारच समजला जातो. शक्यतो जास्त शेतकरी आरली छाटणीचे धाडस करत नाही. फायद्यापेक्षा तोट्याची शक्यता जास्त असते. संपूर्ण निसर्गाशी सामना करावा लागतो. रात्र अन् दिवस मेहनत घ्यावी लागते. औषधांचा खर्चही जास्त असतो.'' - विजय बोरगुडे, द्राक्ष उत्पादक नैताळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT