Protest esakal
नाशिक

Nashik Protest News : गटप्रवर्तक, आशासेविका 16 ऑक्टोबरपासून संपावर; प्रलंबित मागण्या मान्य करण्याचा उद्देश

सकाळ वृत्तसेवा

Nashik Protest News : गटप्रवर्तक, आशासेविका यांच्यावर ऑनलाइन कामासाठी आरोग्य विभागाकडून दबाव आणला जात आहे. बहुसंख्य आशासेविका या अल्पशिक्षित असल्याने त्यांना ॲप वापरण्यात अडचणी येतात. (Group promoter Asha Sevika on strike from October 16 nashik news)

त्यामुळे अशा आशासेविकांना ऑनलाइन कामे सांगणे बंद करावे यांसह इतर प्रमुख प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी १६ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व गटप्रवर्तक आणि आशासेविका या राज्यव्यापी संपावर जात आहे.

याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग आशा गटप्रवर्तक संघटना ‘आयटक’चे राज्य अध्यक्ष राजू देसले यांनी निवेदन दिले.

राज्यात काम करणाऱ्या गटप्रवर्तकांना प्रवास भत्ता दिला जात नाही. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, तो मिळेपर्यंत गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा द्या व सामाजिक सुरक्षा लागू करा, किमान वेतन द्या, दिवाळी भाऊबीज लागू करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

यांसह ‘आयटक’तर्फे जिल्हा परिषदेवर १६ ऑक्टोबरला दुपारी १२ ला बी. डी. भालेकर मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येऊन धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT