gutkha seized 
नाशिक

Nashik Crime News : घोटी शिवारात 63 लाखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शिवारात पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने प्रतिबंधक असलेला गुटखा, वाहनासह ६३ लाख २४ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी चालक, मालक व ट्रान्सपोर्ट मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (Gutkha worth 63 lakh seized in ghoti Shivar nashik crime news)

छत्तीसगड येथून आयशर (सीजी ०४, पीसी ६८९५)मधून समृद्धी महामार्ग ते घोटी-मुंबई-नाशिक महामार्गवरून प्रतिबंधित गुटखा जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शाहजी उमाप यांना मिळाली होती. त्यावरून त्यांच्या विशेष पथकाने संबंधित वाहनाचा पाठलाग केला.

नाष्टा व चहा पाण्यासाठी घोटी टोल नाक्यावर चालक मंगल श्रीनिवास (वय २३, रा. बंगला नंबर १४, घर नंबर ३१४, सिवनी, जहाँगीर चांपा, छत्तीसगड) याने आयशर थांबविला. पोलिसांनी चालकास पकडले.

वाहन व त्यातील मालाची चौकशी केली असता, पोलिसांनी बाहेर बांधकाम साहित्य व आत सुगंधित प्रतिबंधक गुटख्याच्या ६० मोठ्या गोण्या आढळून आल्या.

रायपूर (छत्तीसगड) येथील राजेंद्र कॉम्प्लेक्समधील बन्सल ट्रेडर्स या ठिकाणाहून माल मुंबईकडे घेऊन जात असल्याचे चालकाने सांगितले. त्यावरून श्रीकृष्ण ट्रेडर्स हिमांशू चौक, शॉप नंबर १४ (भिवंडी), भूपेंद्र शाहू (डोंगरगाव, छत्तीसगड) व नायक ट्रान्सपोर्टच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश पवार तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात नवं संकट, काळजी घ्या! PM मोदींकडून देशवासियांना महत्त्वाचं आवाहन

farmer Loan Relief: कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे डोळे; ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सरकारचा मानस, काय असतील संभाव्य निकष?

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘त्या’ दोन विद्यार्थ्यांचीही CBI चौकशी

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Road Accident : हृदयद्रावक घटना! राँग साइडने येणाऱ्या मालवाहू गाडीची दुचाकीला जोरदार धडक; 9 महिन्यांच्या बाळासह एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT