नाशिक

Nashik Crime News : 3 ठिकाणी छाप्यात साडेचार लाखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरातील आयशानगर चौक, डीके कॉर्नर व सवंदगाव फाटा या तीन वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने छापा टाकून सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला.

गुटखा विक्री करणाऱ्या तिघांसह रिक्षाचालक अशा एकूण चार जणांना अटक करण्यात आली. ग्रामीण व शहर पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Gutkha worth four and half lakh seized in raids nashik crime news)

शहरातील आयशानगर भागातील मोहम्मद असलम अब्दुल रज्जाक शहा (३४, रा. दरेगाव शिवार) याच्या ताब्यातून अवैध विक्रीसाठी बाळगलेला केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू असा १ लाख ४९ हजार ३७२ रुपयांचा गुटखा, दीड लाख रुपये किमतीची रिक्षा (एमएच १५ एके ५८२४) असा एकूण २ लाख ९९ हजार ३७२ रुपयांचा गुटखा जप्त केला.

पोलिस शिपाई योगेश कोळी यांच्या तक्रारीवरून आयशानगर पोलिस ठाण्यात मोहम्मद असलम व रिक्षाचालक अकील शकील अहमद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. सोयगाव भागातील डीके कॉनरजवळील पारिजातनगरात दुसरा प्रकार घडला.

दिनेश संतोष सूर्यवंशी (२३, रा. पारिजात कॉलनी) यांच्या माऊली चौकातील घरात पोलिसांनी छापा टाकून विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू असा विविध प्रकारचा १ लाख ४१ हजार ७०५ रुपयांचा गुटखा जप्त केला. शुक्रवारी (ता. २०) दुपारी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.

कॅम्प पोलिस ठाण्यात दिनेशविरुध्द गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. सवंदगाव फाट्याजवळ फरदीन शेख माजीद (२१, रा. जमहूरनगर) याच्या ताब्यातून पोलिसांनी विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू असा ५ हजार २२५ रुपयांचा गुटखा जप्त केला. शुक्रवारी (ता.२०) दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT