Gutkha worth one lakh seized from Malegaon nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News: मालेगावला सव्वा लाखाचा गुटखा जप्त; तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News: शहरातील नयापूरा, द्याने शिवार व मोमीनपूरा या तीन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून सुमारे सव्वा लाखाचा गुटखा जप्त केला.

याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. गत तीन दिवसांत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून सुमारे दोन लाखांचा गुटखा जप्त केला आहे. (Gutkha worth one lakh seized from Malegaon nashik crime news)

आझादनगर भागातील नयापूरा येथील अब्दुल सलाम मोईनुद्दीन हजारी (६०, नयापूरा) यांच्या दुकानातून १ लाख २४ हजार ५० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी सलाम यास अटक केली आहे.

मोमीनपुरा भागात शहर पोलिसांनी दुसरी कारवाई केली. यात मोहंमद मउजक्कईर बिलाल अहमद (२५, रा. मोमीनपुरा) याच्या किराणा दुकानातून विविध कंपनीचा १ हजार ४३८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

त्याला अटक करण्यात आली आहे. तिसरी कारवाई दिल्ली दरबार खानावळ जवळ झाली यात गुलाम हुसेन शेख मोईन (३३, रा. रमजानपूरा) याच्या जवळून विविध कंपनीचा ८ हजार ३५५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

पानटपरी पाठोपाठ पोलिसांनी आता किराणा दुकानांवर देखील लक्ष केंद्रित केले आहे. पोलिस शिपाई गोविंदा बिऱ्हाडे, योगेश ठाकूर यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध शहर व एका संशयितांविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Meeting News: दिवाळीआधी पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; फडणवीस सरकारने घेतले तीन महत्त्वाचे निर्णय

'सीता और गीता' साठी हेमामालिनी नाही तर 'या' अभिनेत्रीला झालेली विचारणा; नकार दिल्याचा आजही होतोय पश्चाताप

Fastag : भावाने फास्टॅगला खरं लुटलं! 13 राज्ये फिरून आला अन् वाचवले इतके रुपये, टोल प्लाझावाले बघतच राहिले, तुम्हीपण वापरू शकता ही ट्रिक

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

Pimpri Metro: मेट्रोचा पादचारी पूल अद्याप अपूर्णच; मोरवाडी चौकात संथगतीने काम, धोका पत्करून रस्ता ओलांडण्याची वेळ

SCROLL FOR NEXT