NMC Nashik News esakal
नाशिक

NMC Anniversary: वर्धापन दिनी मनपा कर्मचाऱ्यांचे हेल्थ कार्ड

सकाळ वृत्तसेवा

NMC Anniversary : महापालिकेचा ७ नोव्हेंबरला ४१ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त वैद्यकीय विभागाकडून रक्तदान शिबिरासह कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.

या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे हेल्थ कार्डदेखील काढले जाणार आहे. वैद्यकीय विभागाने कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आयुष्यासाठी निर्णय घेतला असला तरी कर्मचाऱ्यांमधील एक वर्ग धास्तावला आहे.

चांगला निर्णय अंगलट येण्याची धास्ती वाटू लागल्याने वैद्यकीय विभागाकडून कार्यक्रम पत्रिकेतून बंधनकारक शब्द काढून त्याऐवजी स्वेच्छा असा शब्द टाकण्याचा निर्णय घेतला आहे. (Health card of NMC employees on anniversary nashik)

दुसरीकडे वैद्यकीय तपासणीसाठी महापालिका मुख्यालयात यंत्रणा निर्माण करता येणे अशक्य असल्याने विभागीय पातळीवर रक्तदान शिबिरासह वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.

महापालिकेत जवळपास ४८०० कर्मचारी असून मुख्यालयात पाचशेच्या आसपास कर्मचारी आहे. या सर्वांसाठी वर्धापन दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे.

मधुमेह, रक्तदाब, क्लोरेस्टोरेल, हृदयाची गती, लिव्हर टेस्टिंग आदी बाबी वैद्यकीय तपासणीत होतील. त्याचबरोबर महापालिकेकडून मुख्यालयात प्राथमिक उपचारासाठी छोटा दवाखाना निर्माण केला जाणार आहे. कर्मचाऱ्याला अचानक त्रास झाल्यास प्राथमिक उपचार करता येणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT