ZP CEO Ashima Mittal, Nashik News esakal
नाशिक

ZP Home Visit Campaign: जिल्ह्यातील मॉडेल गावांमध्ये गृहभेट अभियान

सकाळ वृत्तसेवा

ZP Home Visit Campaign : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी गावे हागणदारीमुक्त अधिक (मॉडेल) केली जात आहेत.

जी गावे मॉडेल झाली आहेत, अशा गावातील स्वच्छतेची शाश्वतता राहावी, यासाठी जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत दृष्यमान स्वच्छतेसाठी कुटुंब भेटी अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. (Home visit campaign in model villages of district nashik zp)

जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत विविध उपक्रम सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे कामे करण्यात येत असून, ३९४ गावांमध्ये ही कामे पूर्ण झाल्याने ही गावे मॉडेल घोषित करण्यात आली आहेत.

सांडपाणी व घनकचऱ्याची कामे पूर्ण झालेल्या गावांमध्ये स्वच्छतेची शाश्वतता राहावी, यासाठी जिल्ह्यात गृहभेट अभियान राबविण्यात येत आहे.

सदरचे अभियान गावस्तरावरील शासकीय कर्मचारी यांच्यामार्फत राबविले जाणार असून, गृहभेटीदरम्यान कुटुंबातील सदस्यांना काही प्रश्न विचारून माहिती घेण्यात येणार असून, त्याकरिता प्रश्नावली तयार करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन, मैला गाळ व्यवस्थापन याविषयी प्रश्न विचारले जाणार असल्याची व याबाबत सर्व तालुक्यांना निर्देश दिल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.

दरम्यान, कुटुंब भेट अभियानात गावस्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, तसेच ग्रामस्थांनी सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: ..म्हणून ऑपरेशन टायगर अपयशी? भाजपच्या शब्दावर खासदारांची मदार, दोघांच्या सह्याच नाहीत

BMC jobs: मुंबई महापालिकेकडून मोठी भरती जाहीर! २० ते ३० हजार पगार अन्... राजावाडी रुग्णालयात विविध पदांसाठी संधी, अर्ज कसा करायचा?

Latest Marathi News Live Update: पुण्यातील कचऱ्यासंदर्भात राज्यमंत्र्यांचे आदेश

T20I World Cup, IND vs NED: स्मृती मानधनाचा अर्धशतकासह मोठा विक्रम, शफाली वर्माचीही वादळी फिफ्टी; भारताच्या २०० धावा पार

Nasrapur Crime Case : नसरापूर प्रकरणात सरकार पक्षाने १६ दिवसांत सादर केले पुरावे; ५५ साक्षीदारांची नोंदवली साक्ष

SCROLL FOR NEXT