Customers buying fruit, flower plants at the nursery after the arrival of rains. esakal
नाशिक

Horticulture Farming : पावसाच्या आगमनाने फळ, फूल रोपांना मागणी! नर्सरीमध्ये खरेदीसाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Horticulture Farming : पावसाच्या दमदार आगमनानंतर परस बागेतील फळ, फूल झाडांचे रोप विक्रेते सटाणा व परिसरात दाखल झाले आहेत.

शेकडो फळ, फुलांचे रोप उपलब्ध झाले असून खरेदीसाठी ग्राहकांची पावले नर्सरी व फळझाडांच्या विक्रेत्यांकडे वळू लागले आहेत. आकर्षक व मनात भरतील असे रोपे खरेदी करताना ग्राहक दिसत आहेत. (Horticulture Farming With arrival of rains demand for fruit and flower plants Rush to buy in nursery nashik)

गतवर्षी पेक्षा यंदा पावसाळा उशिराने सुरू झाल्याने विक्रेत्यांची रोपे पडून होते. आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरणातील पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रोपांना मागणी वाढली आहे. शहरातील रहिवासी घर, बंगला परिसरातील परस बागेसाठी रोपे खरेदी करीत आहेत.

शेतकरी बंगल्यासमोर व बांधावर नारळसह आंबा रोप खरेदी करीत आहेत. यंदा मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक या भागातून आंबा व नारळाची तर रत्नागिरी बलसाड येथून चिकू रोप विक्रीसाठी दाखल झाले आहेत. बहुतांश विक्रेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन रोपांची विक्री करीत आहेत.

"शहरासह आता ग्रामीण भागांतही परस बाग करण्याची आवड अनेकांना वाटते. पावसाळ्याच्या आगमनानंतर फूल, फळ झाडांच्या रोपांना मागणी आहे. जून महिन्यात पाऊस कमी झाल्याने विक्री झाली नाही. आता जोरदार पावसाच्या आगमनाने सध्या रोपांची विक्री चांगली आहे."

- सुशिल पाल, फूल, फळ झाड विक्रेते, सटाणा

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असे आहेत रोपांचे दर

फुलझाडे

गुलाब ६० ते १०० रुपये

जास्वंदी, मोगरा ६० ते ९०

जाई, शेवंती ६०,

अशोक ८०,

तुळस, गवती चहा ३० रुपये,

गोल्डन, आरकेपाम, बटरपाम १५०

रबरपॅन- २००

मधुमालती १००

कदंब १२०

फळझाडे :-

नारळ ४००

चिकू ३००

आंबा, रामफळ, आवळा, फणस- १००

पेरू १८०

लिंबू, समीपत्रा १५०

बदाम ५० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Ashadhi Ekadashi 2026 Breakfast Recipe: आषाढी एकादशीच्या उपवासासाठी झटपट रेसिपी; १५ मिनिटांत बनवा मऊ, स्पंजी उपवासाची इडली

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

SCROLL FOR NEXT