Crime news sakal
नाशिक

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; संशयित पोलिस ठाण्यात स्वतः हजर

पोलिस चौकशीतून अधिक माहिती मिळू शकेल अशी शक्यता आहे.

नरेश हाळणोर

नाशिक : पाच दिवसांपूर्वी औरंगाबादवरून नाशिकमध्ये आलेल्या संशयित पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या गळ्यावर वार करीत खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरची घटना चुंचाळे शिवारातील दत्तनगरमध्ये घडला आहे. संशयित पती पत्नीचा खून करून औरंगाबाद येथील वाळुंज पोलिस ठाण्यात स्वतः हजर झाल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे.

संगीता सचिन पवार (२२) असे मयत पत्नीचे नाव आहे. तर, सचिन पवार (२८, रा. एकतानगर, वाळुंज, औरंगाबाद) या संशयित पतीला अंबड पोलिसांनी औरंगाबादच्या वाळुंज पोलीसांकडून ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित सचिन पवार हा अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये कामाला होता. पाच दिवसांपूर्वी तो पत्नी संगीता हिला घेऊन नाशिकला आला होता. यादरम्यान त्याने पत्नीचे अनैतिक संबंध असून, तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्याने रविवारी (ता. २६) सायंकाळी घरी आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी संशयित सचिन याने पत्नी संगीताच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करीत तिचा खून केला. त्यानंतर त्याने घराच्या दाराला कुलूप लावून वाळुंजला (औरंगाबाद) निघून गेला.

याप्रकरणी अंबड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे, हेमंत आहेर, जनार्दन ढाकणे, मच्छिंद्रनाथ वाक्‌चौरे यांच्या पथक संशयिताला औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यातून घेतले आहे.

स्वत:च झाला हजर

पत्नी संगीताचा खून केल्यानंतर संशयित सचिन याने औरंगाबाद गाठले. सोमवारी (ता.२७) पहाटे अडीच-तीन वाजेच्या सुमारास तो वाळुंज पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला आणि त्याने पत्नीचा खून केल्याचे सांगितले. वाळुंज पोलिसांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. अंबड पोलिसांनी शहानिशा करण्यासाठी चुंचाळे शिवारातील दत्तनगरमधील संशयिताचे घर गाठले. घराचा दरवाजा तोडून आत पाहिले असता, संगीता मृतावस्थेत होती. तिच्या गळ्यावर वार करण्यात आलेले होते. घटनेची सत्यता पटल्यानंतर अंबड पोलिस ठाण्याचे एक पथक संशयित सचिन यास ताब्यात घेण्यासाठी वाळूंजला रवाना करण्यात आले. पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

Railway Fraud: पुणे-मुझफ्फरपूर एक्स्प्रेसमध्ये बनावट तिकीट पर्यवेक्षक बनून प्रवाशांची लूट; दोन कोच अटेंडंट रंगेहात पकडले

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT