Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : पतीच्या आत्महत्येप्रकऱणी प्रियकरासह पत्नीला अटक

सकाळ वृत्तसेवा

सिडको : पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे मानसिक तणावात येत पतीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी पत्नीसह तिच्या प्रियकरावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश उर्फ राधेशाम टिकमदास वैष्णव-बैरागी (३४, रा. माऊली लॉन्स नवीन नाशिक) हे मंगळवारी (ता.२०) घरातून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. गुरूवारी (ता.२२) एक मृतदेह बापू पुलानजीक तरंगताना बोटिंगला आलेले अंबादास तांबे यांनी बघितला होता. (Husband suicide case Wife arrested with boyfriend Nashik Crime News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

त्यांनी याबाबत तात्काळ गंगापूर पोलिसांना माहिती दिली. तो मृतदेह राकेशचा असल्याची पोलिसांना खात्री झाली. राकेशच्या नातेवाईकांनी त्यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला. मात्र अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगिरथ देशमुख यांनी या घटनेत तपासानंतर काही तथ्य आढळ्यास खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन नातेवाईकांना दिले होते.

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात राकेश यांची तीस वर्षीय पत्नी व तिचा प्रियकर रिझवान मन्सुरी (२५, रा. बजरंगवाडी ) यांच्यांतील अनैतिक संबंधामुळे मानसिक तणावात आल्याने राकेश यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत खतेले तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT