Latest Marathi News | अवैध खडीक्रशरप्रकरणी तलाठी व मंडळ आधिकारी अखेर निलंबित.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suspend News

Nashik News : अवैध खडीक्रशर प्रकरणी तलाठी व मंडळ आधिकारी अखेर निलंबित..

नाशिक : गणेशनगर (ता. नांदगाव) येथील अवैध खडीक्रशर प्रकरणात तेथील मंडळधिकारी बी. एन. पैठणकर यांना निलंबित केले आहे. जिल्‍हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कारवाई केली आहे. दरम्‍यान अधिकाऱ्यावर कारवाई करताना दुसरीकडे अवैध उत्‍खनन करणाऱ्या खडीक्रशर चालकावर अद्याप कारवाई न झाल्‍याने प्रश्‍न उपस्‍थित केले जात आहेत.

मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे आणि जिल्हा गौणखनिज विभागातर्फे १४ डिसेंबरला गणेशनगर येथील गट क्रमांक १/१७ येथे कारवाई केली होती. सहा महिन्यांपासून अवैधपणे सुरू असल्‍याचे समोर आले होते. (Talathi and Mandal officials finally suspended in case of illegal gravel crusher Nashik News)

हेही वाचा : प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Jalgaon News : अमळनेरला विभागीय स्पर्धेत 162 क्रीडापटूंचा सहभाग

जिल्‍हाधिकारींनी केलेल्‍या सूचनेनुसार कारवाईस्‍थळी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. खोदकामाची सविस्‍तर माहिती गोळा करण्यास सांगितले हेाते.

तब्‍बल सहा महिन्‍यांपासून क्रशरचालकाकडून अवैधरित्‍या उत्‍खनन सुरु असताना स्‍थानिक प्रशासनाने कारवाई का केली नाही? तहसिलदारांना उत्‍स्‍खनाची माहित नव्‍हती का? असे प्रश्‍न उपस्‍थित केले जात होते.

या पार्श्‍वभूमीवर अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दरम्‍यान नांदगावचे मंडळाधिकारी पैठणकर यांना निलंबित केले असले तरी जिल्‍हा प्रशासनाने क्रशरचालकाला दंडाची नोटीसही बजावलेली नसल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जाते आहे. आता यापुढे प्रशासनाची काय भूमिका राहिल, याकडे लक्ष लागून राहाणार आहे.

हेही वाचा: Nashik News: सोयी नको, निदान समस्या आवरा; राजमाता जिजाऊ क्रीडासंकुल उद्यान बनले समस्यांचे आगार