Illegal liquor stock seized from Innova esakal
नाशिक

Crime : सातपूरला इनोव्हातून अवैध मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दादरा, नगर हवेली येथील मद्य नाशिकमध्ये तस्करी करून आणले जात असताना, सातपूर येथील पपया नर्सरीजवळ सापळा रचून पकडले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता. २६) ही कारवाई केली असून, एक इनोव्हा कार व विदेशी मद्यसाठा असा साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Illegal liquor stock seized from Innova in Satpur Nashik Crime latest marathi news)

मुकेश शिवाजीभाई बागूल (२९, रा. लक्ष्मीनगर, काडापुल पुनागाव, जि. सुरत), असे संशयिताचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिकच्या पथकास त्र्यंबक- नाशिक रोडने परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती.

विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सातपूर येथील पपया नर्सरीजवळ सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी केली असता, या इनोव्हा कारमध्ये (जीजे- ०५- सीजी- ३८७०) दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असणारे व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित विदेशी मद्य इनोव्हाच्या विविध भागात चोर कप्पे करून दडवून ठेवल्याचे आढळून आले.

सदरची कामगिरी निरीक्षक एस. एस. देशमुख, दुय्यम निरीक्षक प्रवीण ठाकूर, एम. आर. तेलंगे, सहदुय्यम निरीक्षक एच. एस. नेहेरे, जवान विजेंद्र चव्हाण, रमाकांत मुंढे, किरण कदम,. गोकूळ परदेशी यांनी बजावली. तपास प्रवीण ठाकूर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लडाख आमचाच! भारताने २८ ठिकाणांची नावे जाहीर करताच चीनची आडमुठी भूमिका, नामकरणाला विरोध

दिल्लीत १५ वर्षांच्या मुलांमध्येही GI कॅन्सर! वायुप्रदूषण ठरतंय का छुपा धोका? वाचा डॉक्टर काय सांगतात

IndiGo Flight Cancellation: इंडिगोचा मोठा निर्णय! 'त्या' देशाकडे जाणारी उड्डाणे १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द

Latest Marathi News Live Update: पार्थ पवार यांनी शेतकरी व सभासदांशी साधला संवाद; विजयाबद्दल मानले आभार

Manchar News : अवसरी खुर्द येथील सरकारी ओढ्यावरील अतिक्रमण हटविले; महसूल विभागाची मोठी कारवाई, शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT