Crime esakal
नाशिक

अवैध मद्याची वाहतूक; वाहनासह एकाला अटक

नरेश हाळणोर

नाशिक : मुंबई- आग्रा महामार्गावरील ओझर येथील दहावा मैल परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अवैधरीत्या वाहतूक केले जाणारे दारू साठा व सहा चाकी वाहन, असा ५३ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (illegal liquor stocks and 6 wheelers 53 lakh 88 thousand seized at Ojhar on Mumbai-Agra highway in nashik)

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक हे सोमवारी (ता. २७) मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालत होते. या वेळी पथकाला अवैध मद्य वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, पथकाने ओझर येथील दहावा मैल येथील कारभारी हॉटेलसमोर सहा चाकी वाहनाची (एमएच- ४३- वाय- ९२५१) तपासणी केली.

या वेळी वाहनात गोवा राज्यात तयार केलेली मात्र महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला दारू साठा आढळून आला. वाहन चालक बबलू हरभजन यादव (३९, रा. उत्तर प्रदेश) यास पथकाने अटक केली. तसेच, पाच हजार ४०० लिटर दारू साठा व वाहन असा एकूण ५३ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक ए. एस. चव्हाण, दुय्यम निरीक्षक अ. गो. सराफ, व्ही. एम. पाटील, जवान गोकुळ शिंदे, विठ्ठल हाके, भाऊसाहेब घुले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT