issue of illegal businesses in Bhadrakali in winter session nashik news esakal
नाशिक

Nashik News: भद्रकालीतील अवैध धंद्यांचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात; नीतेश राणे यांनी केली कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा मुद्दा थेट नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात चर्चेला आला आहे.

भाजप आमदार नीतेश राणे यांनी सदर मुद्दा उपस्थित करीत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. (issue of illegal businesses in Bhadrakali in winter session nashik news)

याबाबत नवनियुक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक याप्रकरणी काय भूमिका घेतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, गेल्या वर्षीही हिवाळी अधिवेशनात आ. राणे यांनी अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांविषयी प्रश्न उपस्थित केला असता, तत्कालीन पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांची बदली करण्यात येऊन उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून, बुधवारी (ता. १३) सकाळ सत्रामध्ये भाजप आमदार नीतेश राणे यांनी नाशिकमधील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचे सांगत, विशिष्ट समाजाकडून रात्री-बेरात्रीपर्यंत अवैध धंदे चालविले जात असल्याचे सांगितले.

तसेच, या अवैध धंद्यांबाबत भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना अवैध धंद्यांची माहितीही दिली. परंतु त्यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचाही गंभीर आरोप राणे यांनी करीत सभागृहामार्फत कारवाई करण्याची मागणी केली.

स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प का?

भद्रकालीतील अवैध धंद्यांविषयीचा मुद्दा राणे यांनी उपस्थित केला असला तरी, नाशिकचे स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत गप्पा का, असा प्रश्न काही सुजाण नागरिकांनाही पडला आहे.

"या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. त्यानुसार योग्य ती कारवाईही केली जाईल." - संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT