Bribe News esakal
नाशिक

जागृती विद्यालयाच्या मुख्याध्यापकांसह दोघांना लाच घेतांना अटक

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील सोयगाव नववसाहत भागातील जागृती माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी एक हजार २५० रुपयांची लाच घेतांना मुख्याध्यापक राहुल मोराणकर सह शिक्षिकेला अटक झाली.

बुधवारी (ता.१७) दुपारी नाशिक विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने विद्यालयातच ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. (Jagruti Vidyalaya principal along with two arrested for accepting bribe nashik crime Latest Marathi News)

विद्यालयात शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याला सोयगाव महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने पगारात वाढ होऊन घरभाडे भत्ता लागू करण्याचा प्रस्ताव होता. यासाठी मुख्याध्यापक मोराणकर व शिक्षिका चव्हाण यांनी एक हजार ३५० रुपयांची लाच मागितली. संबंधित शिपायाने याबाबत नाशिक लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली.

श्री. मोराणकर यांनी संबंधित शिक्षिकेला ही रक्कम घेण्यास सांगितले. मुख्याध्यापक कार्यालयातच रक्कम स्विकारतांना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी दोघा संशियतांविरुध्द रात्री उशिरापर्यंत कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. गेल्या काही वर्षापासून शहरासह जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार सातत्याने चर्चेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT