AAP Jitendra bhave esakal
नाशिक

नाशिक : आप मधून जितेंद्र भावेंची हकालपट्टी | AAP

विक्रांत मते

नाशिक : आम आदमी पक्षाचे (AAP) जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांची पक्षाच्या सर्व पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेत कारवाई करण्यात आली आहे.

जितेंद्र भावे यांनी शिक्षणाधिकारी धनगर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. एका शासकीय कार्यक्रमासाठी जात असताना भावे व त्यांचे सहकारी जी. रमेश यांनी धनगर यांच्या कार्यालयात प्रवेश करत फेसबुक लाइव्ह (Facebook live) केले. तुम्ही सरकारी अधिकारी हरामाचा पगार घेतात, आम्ही पगार देतो, हे आमचे नोकर आहेत व त्यांना लोकांना भेटायला वेळ नाही, असे शब्द वापरले. त्यावरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात भावे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. त्याचबरोबर आपच्या प्रदेश नेत्यांनी धनगर यांची भेट घेत दिलगिरी व्यक्त केली होती. भावे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याबरोबरच ते माफी मागणार नाही, तोपर्यंत तक्रार मागे घेणार नसल्याची भूमिका धनगर यांनी घेतली होती. भावेंच्या वक्तव्याची आपचे पदाधिकारी रंगा राचुरे, किशोर मानध्यान, विजय कुंभार, धनंजय शिंदे यांनी दखल घेत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान, पक्षाने केलेल्या कारवाई संदर्भात आपल्याला माहीत नसल्याचे भावे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT