Kalika Devi jatra News esakal
नाशिक

कालिकादेवी यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ; पहाटे 3ला काकड आरती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिककरांचे ग्रामदैवत अर्थात श्री कालिकादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार (ता. २६) विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. पहाटे तीनला काकड आरती, तर पहाटे पाचला विश्वस्तांच्या हस्ते घटपूजन होणार आहे. सकाळी सातला आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते घटस्थापना व आरती होणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील यांनी दिली.

सकाळी आठला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पद्माकर भोसले यांच्या हस्ते अभिषेक आणि आरती होणार आहे. सकाळी नऊला महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते देवीची महाआरती होणार आहे. दुपारी बाराला नैवेद्य व आरती, दुपारी एक ते सायंकाळी पाचपर्यंत महिला मंडळांचा भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी सातला मंगल वाद्याच्या गरज व रात्री बाराला महाआरती होणार आहे. दरम्यान, मंदिराच्या आवारातील मंडपासाठी दिवसभर लगबग सुरू होती. (Kalika Devi Jatra starts from today Kakad Aarti at 3am nashik Latest Marathi News)

भाविकांनी ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात दर्शनासाठी येण्याचे आवाहन संस्थानचे सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, कोशाध्यक्ष सुभाष तळाजीया, आबा पवार, किशोर कोठावळे, संतोष कोठावळे, योगेश पवार, विशाल पवार यांच्यासह माजी नगरसेवक दत्ता पाटील, सुरेंद्र कोठावळे, राम पाटील, भरत पाटील, दीपक तळाजीया, श्‍याम पाटील आदींनी केले आहे.

व्यावसायिकांची लगबग

कालिका यात्रोत्सव काळात संभाव्य गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासन रस्त्याच्या एका बाजूला दुकाने लावण्याबाबत आग्रही आहे. परंतु त्याकडे कानाडोळा करत रविवारी अनेक व्यावसायिकांची दुकाने लावण्यासाठी लगबग सुरू होती. मंदिराच्या आवारातही मोठ्या प्रमाणावर प्रसादाची दुकाने थाटली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT