minister Chhagan Bhujbal become aggressive 
नाशिक

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा : गायकर

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाला राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचाच खरा विरोध आहे. त्यांच्या सभोवताली घुटमळणाऱ्या मराठा बांधवांनी शहाणे व्हावे, अशी समाजाची भावना आहे.

भुजबळ यांनी कुठल्याच संविधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही. (Karan Gaikar statement Chhagan Bhujbal should resign as minister maratha reservation nashik news)

त्यांनी स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, राजीनामा देण्याची त्यांची इच्छा नसेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी केली.

मराठा समाजाच्या पाठिंब्यामळे भुजबळ यांचा राजकीय प्रवास झाला आहे. शिवसेनेशी गद्दारी केल्यावर मुंबईच्या स्वाभिमानी मराठा समाजाने त्यांचा पराभव केला. नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाने त्यांना राजकीय जीवनात पुन्हा उभे केले. पुतणे समीर यांनाही लोकसभेत पाठविले. मराठा समाज कुणाच्याही ताटातील भाकरी ओरबाडून घेत नाही.

उलट काही काळ अर्धपोटी राहून आपल्या इतर भावंडांना आपल्या घासातील घास देतो, ही संस्कृती आहे. याच संस्कृतीशी प्रामाणिक राहून मराठा समाजाने आजवर आपल्या हक्काचे आपल्या ताटातील आरक्षण आपल्या ओबीसी भावंडांना दिले. आज काही निवडक राजकीय नेते कार्यकर्त्यांना मराठा समाजाविरुद्ध भडकावत आहेत.

त्यांना केवळ त्यांची सत्तापदे टिकवायची आहेत, म्हणून मराठा व ओबीसी या दोन समाजांत दरी निर्माण करण्याचा प्रयत्न भुजबळ करीत आहेत. त्यांचे सध्याचे वक्तव्य आणि भूमिका या शपथवचनाचा भंग करणारी आहे. त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT