bjp leader Kirit Somaiya  esakal
नाशिक

Kirit Somaiya : अब कि बारी रवींद्र वायकर...: किरीट सोमय्या

सकाळ वृत्तसेवा

Kirit Somaiya : शिवसेनेचे पदाधिकारी रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे भागीदार आहे. मुंबईत त्यांच्या ५०० कोटीच्या हॉटेलचे कामकाज सुरू आहे.

त्यात तत्कालीन मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून भूखंड देण्यासाठी मदत झाल्याने या प्रकरणात वायकर यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज येथे केला. (Kirit Somaiya statement about action on Ravindra Vaikar nashik poltiical news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. सोमय्या आज नाशिकला होते. पोलिस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालय आवारात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी आदी उपस्थित होते.

श्री. सोमय्या म्हणाले की, रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे भागीदार आहेत. त्यांच्या सुमारे ५०० कोटीच्या हॉटेलचे कामकाज मुंबईत सुरू आहे. ज्या हॉटेलचे कामकाज सुरू आहे त्या हॉटेलसाठी जो भूखंड उपलब्ध करून दिला गेला त्यात तत्कालीन मुंबई महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणेने मदत केली.

त्यामुळे अशा सुमारे एक डझनभर अभियंत्यांना नोटीस देऊन चौकशी सुरू आहे. नगरविकास विभागाकडून ही चौकशी सुरू आहे. न्यायालयानेही यात लक्ष घातले आहे. त्यामुळे या पुढील कारवाई आता रवींद्र वायकर यांच्यावर असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT