Wedding-Hall esakal
नाशिक

नाशिक : विवाहांसाठी नव्हे, तर वर्षश्राद्धांसाठी लॉन्स फुल्ल

दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : मागील वर्षी मार्च, एप्रिल व मे महिन्यांत कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत अनेकांनी जवळचे आप्तस्वकीय गमावले. काहींनी आई व वडील असे दोघेही गमावले. सध्या इहलोकी गेलेल्या आप्तांचे वर्षश्राद्ध विधी होत असून, त्यासाठी परिसरातील लॉन्स, धर्मशाळा, छोटी -मोठी कार्यालये अक्षरशः फुल्ल असल्याचा अनुभव अनेकजण घेत आहेत.

एप्रिलमध्ये होता मृत्यूदर अधिक

मागील वर्षी कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आप्तस्वकीय गमवावे लागले. मार्च, एप्रिलमध्ये वाढत्या मृत्यूदराने कोरोनाची भीषणता अधिकच वाढली होती. या सर्वांचे वर्षश्राद्धादी विधी सध्या सुरू असून, घरातील व्यक्तींना वर्षश्राद्ध कार्यक्रमाला जाण्यासाठी नियोजन आखावे लागत आहे. कारण अनेकांनी एकाच दिवशी अनेक नातलग गमावल्याने दाट विवाह तिथीसारखेच वर्षश्राद्ध सुरू आहेत. पंचवटीतील अनेक धर्मशाळा, कार्यालये, औरंगाबाद रोडवरील लॉन्स वर्षश्राद्ध विधींसाठी अक्षरशः फुल्ल झाले आहेत.

गंगाघाटावरही उसळतेय गर्दी

रामकुंडाचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याने याठिकाणी देशासह राज्याच्या सर्वच भागातून श्राद्धविधींसाठी बारमाही गर्दी असते. त्यातच मागील कोरोनामुळे मोठ्या संख्येने मृत्यू पावल्याने विधींसाठी येणाऱ्यांच्या गर्दीत मोठी वाढ झाली आहे. सकाळी तर रामकुंड परिसरात पाय ठेवायलाही जागा नसते, अशी परिस्थिती आहे.

किर्तनकारांचे भाव वधारले

हिंदू धर्मियांत दशक्रिया, वर्षश्राध्द आदी विधींसाठी प्रवचन, किर्तनाचे आयोजन करण्याची प्रथा आहे. कोरोनामुळे दोन वर्षे इतर विधींसह प्रवचन, किर्तनालाही परवानगी नव्हती. मात्र, या वर्षी वर्षश्राद्धांची संख्या मोठी असल्याने प्रवचन, किर्तनसाठी किर्तनकार मिळणे अवघड झाल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेकांनी दिली.

मुलावर श्राद्ध घालण्याची वेळ

दाट लग्नतिथीत पूर्वी कुटुंब पद्धती असल्याने विभागून माणसे पाठविली जातं. आता एकत्र कुटुंब पद्धती ऱ्हास पावल्याने अनेकांना एकाच दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधींना हजेरी लावावी लागत आहे. यात वडीलांना मुलांचे श्राद्ध घालण्याचा कटू प्रसंगही काही ठिकाणी समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

CJI Surya Kant: ''..तर राजीनामा द्या!'' काँग्रेसची सरन्यायाधीशांवर पोस्ट, गदारोळ होताच पोस्ट डिलीट

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT