माणुसकीला काळीमा फासणारी घटना; संशयिताला अटक

father raped his own daughter suspect arrested
father raped his own daughter suspect arrestedesakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : चाळीस वर्षे वयाच्या नराधम बापाने स्वतःच्या १३ वर्ष वयाच्या मुलीवर अत्याचार (Rape) केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना चिचोंडी खुर्द येथे घडली आहे. हा अत्याचार सहन न झाल्याने याच मुलीने आवाज उठवत पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर (Police Helpline Number) तक्रार देऊन या घटनेला वाचा फोडली आहे. नराधम बापाला शहर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. अत्याचाराच्या घटनेबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे.

father raped his own daughter suspect arrested
आधी सडकसख्यांना चांगलेच चोपले अन् केले पोलिसांच्‍या स्‍वाधीन

फिर्यादी मुलगी तेरा वर्ष आणि पाच महिन्यांची असून तिचा नराधम बाप हा चाळीस वर्षांचा आहे. मुलीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. चिचोंडी खुर्द येथील चारी क्रमांक ३६ जवळ रहिवासी असलेल्या मजूर बापाने आपल्या मुलीवर राहत्या घरात ती पाचवीत असल्यापासून (वेळ आणि महिना माहीत नाही) ते आतापर्यत वेळोवेळी घरात कुणीही नसतांना एकटी असल्याचा फायदा घेत जीवे ठार मारण्याची धमकी देत अत्याचार केला. मालेगाव शहर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रीती सांवजी यांच्या उपस्थितीत गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक सूरज मेढे याप्रकरणी तपास करत आहे. जिल्हा पोलिस प्रमुख सचिन पाटील यांनीही या प्रकरणी लक्ष घातले असून येथील पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत (Pocso Law) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

father raped his own daughter suspect arrested
महिला सबलीकरण जनजागृतीसाठी 6 रणरागीनींची 450 किमी सायकलवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com