Leopard attack on farmer bakerao jadhav esakal
नाशिक

Leopard Attack : सोनजांब येथे शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

दिगंबर पाटोळे, सकाळ वृत्तसेवा

वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील सोनजांब येथे श्री बाकेराव हरी जाधव(६०) हे आपल्या शेतातील विहिरीकडे घरातील पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्यासाठी जात असताना अचानक या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला.

त्या मध्ये ह्या शेतकऱ्याच्या मानेला, गळ्याला , तसेच पायाला मोठ्या प्रमाणत जखमा झाल्या असून संबधीत शेतकऱ्याने जोरदार प्रतिकार केला व तसेच आरडाओरड केल्याने परिसरात शेतकरी त्वरित आल्याने त्या शेतकऱ्याची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली असून, त्यांना प्रचंड जखमा झाल्या असून उपचारासाठी जवळच खेडगाव येथे उपचारासाठी आणले असता, त्यांना मोठ्या प्रमाणत टाके पडले आहे. पुढील उपचारासाठी त्यांना मोठ्या हॉस्पिटलला पाठविले आहे. (Leopard attack on farmer in Sonjamb Nashik Latest Marathi News)

सोनजांब ,जवळके वणी , गोंडेगाव परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणत वावर नेहमीच दिसला असून अनेक शेतकऱ्यांचे कुत्रे , शेळ्या ह्या बिबट्यांनी फस्त केल्या असुन, अनेक वेळा शेतकऱ्यांनी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. मात्र अजुन पर्यंत ह्या परिसरात कधीही पिंजरा लावण्याची तस्दी वनविभागाने घेतलेली नाही.

वनविभाग शेतकरी वर्गाची बिबट्याची शिकार होण्याची वाट बघत आहे की काय?असा प्रश्न उपस्थित लोकांनी व्यक्त केला आहे. लवकरात लवकर या परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त वनविभागच्या आधिकरी वर्गाने करावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

Pune Fraud: वाघोलीत बनावट जिल्हाधिकारी व तहसीलदार आदेश प्रकरण उघड: शेतजमीन नोंदणीसाठी शासनाची फसवणूक

Pune Crime : येरवड्यात आरडाओरड्याचा जाब विचारल्याने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आरोपी शोएब कुरेशी अटकेत

Pune Burglary: सिंहगड रस्त्यावर बंद घरफोडी; २४ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

SCROLL FOR NEXT