Latest Crime News | मोबाईल वितरकाकडून 4 कोटींची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime fraud news

Fraud Case : मोबाईल वितरकाकडून 4 कोटींची फसवणूक

नाशिक : नामांकित मोबाईल कंपनीच्या अधिकृत वितरकाने राज्यातील आठ मोबाईल विक्रेत्यांकडून मालासाठी आगाऊ रक्कम घेऊनही माल न देता तब्बल चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी संबंधित मोबाईल कंपनीकडे विक्रेत्यांनी रकमेसाठी पाठपुरावा केला असता, त्यांच्याकडूनही उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने विक्रेते हतबल झाले असून, फसवणुकीची रक्कम वाढण्याचीही शक्यता तक्रार अर्जाद्वारे केली आहे. (4 crore fraud by mobile distributor Nashik Latest Crime News)

हेही वाचा: मृतदेहासाठी तिरडी बांधणे एक "अनमोल सामाजिक दायित्व"

नामांकित मोबाईल कंपनीचे राज्यातील अधिकृत वितरक हे नाशिकमधील इगल इलेक्ट्रॉनिक्स इंडिया असून, यांचे संचालक अनिल वासुदेव खेमानी, नीलम अनिल खेमानी, सीता वासुदेव खेमानी, वासुदेव राधाकिसन खेमानी हे आहेत. पारस गौतमचंद छाजेड (रा. औरंगाबाद), आदित्य राधेश्याम मालीवाल (रा. औरंगाबाद), यासिर अब्दुल रशीद बागवान (रा. कोल्हापूर), प्रमोद श्यामसुंदर सोनी (रा. इचलकरंजी), सुयोग कलानी (रा. सोलापूर), सुहास गजानन उनवणे (रा. कराड), मोहसीन जावेद कादरी (रा. बीड), आनंद सुभाष लोढा (रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) यांनी भद्रकाली पोलिसात दिलेल्या तक्रार अर्जानुसार आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारीनुसार, एका कंपनीचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर असलेल्या इगल इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा. लि.च्या संचालकांशी तक्रारदारांचे तीन वर्षांपासून व्यावसायिक संबंध होते. मात्र, जुलैत तक्रारदारांनी मालासाठी आगाऊ रक्कम दिली. मात्र त्यांना ऑगस्ट महिन्यात वितरकांकडून माल देण्यात आला नाही. याबाबत त्यांनी संबंधित वितरकाकडे मालाची मागणी करीत पाठपुरावा केला. तसेच, कंपनीकडेही पाठपुरावा केला.

मात्र, त्यांच्याकडून स्टॉक नसल्याचे प्रारंभी सांगण्यात आले. नंतर, कंपनीने संबंधित वितरकाशी असलेले ॲग्रिमेंट संपुष्टात आल्याचे कंपनीने या विक्रेत्यांना सांगितले. तसेच, वितरकांनी मालासाठी दिलेल्या पैशांबाबतही कंपनीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या वितरकांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात धाव घेत वितरक इगल इलेक्ट्रॉनिक्स इंडिया संचालकांकडून सुमारे ४ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अर्ज दिला. त्यानुसार आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांनी दिली.

हेही वाचा: Crime Update : बंद घराची संधी साधून पावणे सहा लाखांची घरफोडी

Web Title: 4 Crore Fraud By Mobile Distributor Nashik Latest Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..