बार्डे : पिंजऱ्याचा दरवाजा बंद असल्याने निसटलेला बिबट्या.  
नाशिक

सीसीटीव्हीतला थरार! तो आला..अन् फसणार तितक्यात काहीच मिनीटांत उलटला फासा

किरण सुर्यवंशी

नाशिक / अभोणा : गेल्या महिन्यापासून परिसरात त्याच्या मुक्तसंचारामुळे आधीच दहशत निर्माण झालेली अशात त्याला पकडण्यासाठी लावलेला सापळाही जोरदार वाऱ्यामुळे कोलमडला. यामुळे तो आला पण दरवाजाच बंद असल्याने अलगद निसटला. आणि या सर्व घटनाक्रमाची चित्रे सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. नेमका काय आहे प्रकार एकदा वाचाच...


काहीच मिनीटांत उलटला फासा
बार्डे, गोसराणे (ता.कळवण) परिसरातील बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण झाले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी (ता.३१) किशोर वाघ व सोमवार(ता.२) आदीश वाघ यांच्या घराजवळ जनावरांच्या गोठ्यावर बिबट्याने हल्ला करण्याची व कुत्रा भुंकताच धूम ठोकल्याची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. कनाशी वनविभागाने तत्काळ या परिसरात पिंजरा लावला. मात्र शुक्रवारी (ता.७) पहाटे एकला जोरदार हवेमुळे पिंजऱ्याचा दरवाजा आपोआप खाली पडला. त्यानंतर काही मिनिटातच बिबट्या पिंजऱ्याजवळ आला. परंतु दरवाजा बंद झाल्याने तो पिंजऱ्यात अडकू शकला नसल्याचे दृश्य पंडित वाघ यांच्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे.


सातच्या आत घरात
काही महिन्यांपासून या परिसरात बिबट्यांची संख्या वाढली असून, पाळीव जनावरांवर वारंवार हल्ले होत आहे. मक्याचे पीक वाढल्याने कुठूनही अचानक हल्ला होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. या भीतीपोटी बहुतांश शेतकऱ्यांनी आपापल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सर्वचजण ‘सातच्या आत घरात’ अशी स्थिती आहे. सीसीटीव्हीत कैद होणारा बिबट्या प्रत्यक्षात पिंजऱ्यात कधी कैद होतो. या अपेक्षेने नागरिक जीव मुठीत धरून आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam: कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर; धरणात 92.70 टीएमसी पाणीसाठा : पावसाचा जोर ओसरला

Gold Price Forecast : अमेरिका-इराण संघर्षाचा सोन्या-चांदीवर परिणाम; सोन्याच्या दरावर दबाव कायम, भाव आणखी वाढणार?

Amit Shah NUC FDC: राज्यात नागरी सहकारी वित्त महामंडळ, अमित शहा यांची घोषणा, शहरी बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी

Marathi News Live Updates : कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर; 92.70 टीएमसी पाणीसाठा

PMC Tree Cutting Issue : बांधकामासाठी ५०० झाडं तोडली, पण ३५०० कुठे लावली? नियमबाह्य वृक्षतोडीवरून पुणे महापालिकेची कोंडी

SCROLL FOR NEXT