esakal | ब्रेकिंग : नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

nandgaon murder.jpg

नांदगाव तालुक्यातील वाखारी ता.नांदगाव जवळील जेउर रस्त्याच्या लगत कुटुंबातील पती पत्नी व दोघा लहान मुलांची निर्घूण हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे नांदगाव तालुका हादरला आहे.

ब्रेकिंग : नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

sakal_logo
By
भारत देवरे

नाशिक / नांदगाव :  तालुक्यातील वाखारी ता.नांदगाव जवळील जेउर रस्त्याच्या लगत कुटुंबातील पती पत्नी व दोघा लहान मुलांची निर्घूण हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे नांदगाव तालुका हादरला आहे.

समाधान आण्णा चव्हाण( ३७) भरताबाई चव्हाण  (३२) गणेश समाधान (६)आरोही समाधान चव्हाण( ४) अशा एकाच कुटुंबातील ही हत्या करण्यात आल्याने अख्खा तालुका हादरला आहे. पहाटेच रिक्षा चालक समाधान चव्हाण त्याची पत्नी मुलगा मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसले. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, पोलीस घटनास्थळी पोहचले असून याचा अधिक तपास करत आहेत.

दरोडेखोर की मनोविकृत ? अशी चर्चा सध्या आहे. सर्वसाधारण कुटुंबातील चौघे रात्री मळ्यातल्या घरातल्या ओसरीत झोपलेले होते. रक्ताच्या थारोळ्यात चौघांचे मृतदेह आढळून आल्यानै मोठी खळबळ उडाली. समाधान रिक्षा चालवित असे पण लाँकडाऊनमुळे तोही घरीच होता.बायको भरताबाई मोलमजूरी करीत असे

हेही वाचा : दुर्दैवी! खर्च करूनही हाती काहीच नाही; विवंचनेने ग्रासलेल्या शेतकऱ्याची अखेर हिम्मत सुटलीच

रिपोर्ट - भारत देवरे

संपादन - ज्योती देवरे

go to top