Citizens evacuate the injured from the accident Mahindra Thar. esakal
नाशिक

महिंद्रा थारने कंटेनरला दिली मागुन धडक; चालक जागीच ठार, 5 गंभीर जखमी

पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गांवरिल आठव्या मैल शिवारात शुक्रवार ( ता.२६ रोजी ) पहाटे तीन वाजेच्या सुमारास महींद्रा थारने कंटेनरला मागुन जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण गंभीर आणि एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे अंदाज न आल्याने हि घटना घडल्याची वाहनधारकांमध्ये बोलली जाते. (Mahindra Thar collision with container Driver killed on spot 5 seriously injured nashik latest marathi news)

मुंबई नाशिक लेनवर विल्होळी जवळील आठवा मैल चौफुलीच्या उतारावर हा अपघात झाला.जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

मुंबईहून नाशिकला भरधाव वेगात जाणारी महिंद्रा थार ( क्र.MP 09 WH 9936 ) हि पुढील बाजूचा कंटेनरला ( क्र. MH46 AR 7417 ) पाठीमागून जोरदार धडक दिली.थारकार कंटेनरच्या मागील बाजुत घुसल्याने अपघात झाला आहे.या अपघातात महिंद्रा थार गाडीचा चालक विश्वजीत सोगरा जागीच ठार झाला आहे.

तर आकाश ढोलपुरे, अहमद वसारी, अमित, अक्षय कानडे, शक्ती ठाकुर हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना त्वरित उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असुन काहींची प्रकृति चिंताजनक आहे. महामार्ग पोलीस केंद्र घोटी, पिंपळगाव पेट्रोलिंग वाडीवऱ्हे व नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी मदतकार्यासाठी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT